advertisement

सकाळी उठल्याबरोबर 'या' 6 गोष्टी दिसतायत? मोठ्या संकटांचा असू शकतो इशारा, वेळीच व्हा सावध!

Last Updated:

सकाळची सुरुवात कशी होते, यावर आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो. वास्तुशास्त्र आणि शकुन शास्त्रानुसार, सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आपण काय पाहतो, याचा आपल्या मानसिकतेवर आणि भाग्यावर मोठा परिणाम होतो.

News18
News18
Mumbai : सकाळची सुरुवात कशी होते, यावर आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो. वास्तुशास्त्र आणि शकुन शास्त्रानुसार, सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आपण काय पाहतो, याचा आपल्या मानसिकतेवर आणि भाग्यावर मोठा परिणाम होतो. जर सकाळी उठल्याबरोबर काही अशुभ गोष्टी समोर आल्या, तर तो दिवस तणावपूर्ण आणि नुकसानीचा ठरू शकतो. तुमच्यासोबतही असं घडतंय का? जर सकाळी या 6 गोष्टी दिसत असतील, तर ते भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत असू शकतात.
सकाळी दिसणारे 'हे' 6 अशुभ संकेत
स्वतःची सावली पाहणे
सकाळी उठल्याबरोबर आपली स्वतःची किंवा दुसऱ्याची सावली पाहणे अशुभ मानले जाते. शास्त्रांनुसार, सावली पाहिल्याने मनात भीती, संभ्रम आणि नकारात्मकता निर्माण होते. यामुळे त्या दिवशी कामात अडथळे येऊ शकतात किंवा कोणाशी तरी विनाकारण वाद होऊ शकतो.
फुटलेला आरसा
फुटलेला आरसा घरात असणेच मुळी वास्तुदोष आहे. पण जर सकाळी उठल्यावर पहिली नजर फुटलेल्या आरशावर पडली, तर ते सौभाग्यासाठी घातक मानले जाते. फुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा परावर्तित करतो, ज्यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि घरात गरिबी येते.
advertisement
रात्रीची उष्टी भांडी आणि अस्वच्छता
अनेकजण रात्रीची भांडी सकाळी धुण्यासाठी तशीच ठेवतात. सकाळी उठल्यावर घाणेरडी भांडी किंवा कचरा दिसणे हे दारिद्र्याचे लक्षण आहे. ज्या घरात अस्वच्छता असते, तिथे माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. यामुळे घरात आर्थिक चणचण आणि आजारपण येते.
बंद पडलेले घड्याळ
वास्तुशास्त्रानुसार, घड्याळ हे प्रगतीचे प्रतीक आहे. सकाळी उठल्यावर बंद पडलेले घड्याळ दिसणे म्हणजे तुमच्या प्रगतीत अडथळा येणे होय. थांबलेली वेळ ही आयुष्यातील साचलेपण आणि वाईट काळाची सूचना देते. यामुळे महत्त्वाची कामे रखडू शकतात.
advertisement
खंडित मूर्ती किंवा फाटलेली चित्रे
देवाच्या मोडलेल्या मूर्ती किंवा फाटलेली देवाची चित्रे सकाळी पाहणे मनाला विचलित करणारे असते. खंडित मूर्तींमधून सकारात्मक ऊर्जा मिळत नाही. यामुळे घरातील सुख-शांती भंग पावते आणि कुटुंबात कलह वाढतो.
सकाळचा क्लेश आणि राग
सकाळी उठल्याबरोबर घरातील भांडणे किंवा राग व्यक्त करणे हे सर्वात मोठे दुर्दैव मानले जाते. सकाळी चिडचिड केल्याने तुमच्या शरीरातील उर्जा पातळी कमी होते आणि दिवसभर कामात मन लागत नाही. हे भविष्यातील मोठ्या मानसिक संकटाचे कारण ठरू शकते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
सकाळी उठल्याबरोबर 'या' 6 गोष्टी दिसतायत? मोठ्या संकटांचा असू शकतो इशारा, वेळीच व्हा सावध!
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement