advertisement

T20 World Cup : पाकिस्तानला आता 'चमत्कार'च वाचवणार, सेमी फायनलला जाण्यासाठी काय करावं लागणार?

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप आता निर्णायक वळणावर पोहोचल्यामुळे आणखी थरारक होत चालला आहे. सुपर-8 मध्ये न्यूझीलंडने श्रीलंकेवर विजय मिळवल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत.
1/7
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला, त्यानंतर दोन्ही टीमला 1-1 पॉईंट मिळाला. यानंतर पाकिस्तानचा इंग्लंडविरुद्ध 2 विकेटने पराभव झाला, याचसोबत इंग्लंड सेमी फायनलला पोहोचणारी पहिली टीम ठरली.

2/7
इंग्लंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तान श्रीलंका-न्यूझीलंड सामन्यात श्रीलंकेचा विजय व्हावा, यासाठी प्रार्थना करत होती, पण न्यूझीलंडने श्रीलंकेवर 61 रननी दणदणीत विजय मिळवला आणि पाकिस्तानला धक्का दिला.

3/7
श्रीलंकेविरुद्ध इतक्या मोठ्या फरकाने विजय मिळवल्यामुळे न्यूझीलंडचा नेट रनरेट हा आता +3.050 एवढा झाला आहे. तसंच त्यांची इंग्लंडविरुद्ध एक मॅच शिल्लक आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा विजय झाला तर पाकिस्तान सेमी फायनलच्या रेसमधून बाहेर होईल.

4/7
पाकिस्तानचा नेट रनरेट हा सध्या मायनस 0.461 एवढा आहे आणि त्यांचा श्रीलंकेविरुद्धचा सामना शिल्लक आहे. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध विजयच गरजेचा नाही तर त्यांना न्यूझीलंडच्या नेट रनरेटलाही पिछाडीवर टाकायचं आहे.

5/7
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने पहिले बॅटिंग करून 160 रन केले तर त्यांना श्रीलंकेचा 31 रन किंवा त्यापेक्षा कमीवर ऑलआऊट करावा लागेल, म्हणजेच पाकिस्तानला हा सामना 129 रनच्या फरकाने जिंकावा लागणार आहे. पाकिस्तानने 200 रन केले तर त्यांना श्रीलंकेचा 70 किंवा त्यापेक्षा कमी रनवर ऑलआऊट करावं लागेल.

6/7
दुसरीकडे श्रीलंकेने पाकिस्तानला 100 रनचं आव्हान दिलं तर ते त्यांना 6.5 ते 7 ओव्हरमध्ये पार करावं लागेल. श्रीलंकेने 120 रनचं आव्हान दिलं तर पाकिस्तानला ते 7.5 ओव्हरमध्ये चेस करावं लागेल, त्यामुळे आता चमत्कारच पाकिस्तानला वाचवू शकतो.

7/7
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातल्या सामन्याच्या एक दिवस आधीच इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा विजय झाला तर पाकिस्तान तशीही वर्ल्ड कपमधून बाहेर होईल, पण इंग्लंडने सामना जिंकला तर न्यूझीलंडचा नेट रनरेट कमी होईल. या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानचं समीकरण बदलेल.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement