Rashmika First Engagement: का तुटला होता रश्मिकाचा पहिला साखरपूडा? रक्षितसोबत काय बिनसलं? अखेर समोर आलं कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
3 जुलै 2017 रोजी रश्मिकाच्या विराजपेट या मूळ गावी या जोडीचा साखरपुडा अत्यंत थाटामाटात पार पडला. रश्मिका 21 वर्षांची होती, तर रक्षित 34 वर्षांचा. वयातील अंतर असूनही त्यांच्यातील समंजसपणा पाहून दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील हे सर्वात 'क्युट कपल' मानले जाऊ लागले. लवकरच सनई-चौघडे वाजतील अशी सर्वांना अपेक्षा होती.
आयुष्यात 'पहिले प्रेम' ही गोष्ट खूप खास असते. कुणाचे हे प्रेम लग्नापर्यंत पोहोचते, तर कुणाचे अर्ध्यावरच सुटते. सिनेसृष्टीतील झगमगत्या जगातही अशा अनेक प्रेमगाथा फुलतात आणि कोमेजतात. सध्या दाक्षिणात्य सुंदरी रश्मिका मंदाना तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे जगभर चर्चेत आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये ती विजय देवरकोंडासोबत आयुष्याची नवी सुरुवात करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण, या आनंदाच्या वातावरणात रश्मिकाच्या आयुष्यातील 'त्या' एका प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे, ज्याने एकेकाळी सर्वांनाच धक्का दिला होता.
advertisement
advertisement
रश्मिका मंदाना हिने 2016 मध्ये 'किरिक पार्टी' या कन्नड चित्रपटातून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले. तेव्हा ती अवघ्या 20 वर्षांची होती. त्याच चित्रपटाचा नायक आणि लेखक होता रक्षित शेट्टी. रक्षित तेव्हा आधीच स्टार होता. सेटवर काम करता करता त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही. रक्षित आणि रश्मिकाची जोडी केवळ पडद्यावरच नाही, तर खऱ्या आयुष्यातही चाहत्यांना 'मेड फॉर इच अदर' वाटू लागली होती.
advertisement
मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. सप्टेंबर 2018 मध्ये, साखरपुड्याच्या अवघ्या एका वर्षानंतर या जोडीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे दोघांचे करिअरबद्दलचे टोकाचे वेगळे विचार. 'किरिक पार्टी'च्या यशानंतर रश्मिकाला तेलुगू आणि तमिळ सिनेसृष्टीतून मोठ्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. तिला या संधीचं सोनं करून आपलं करिअर विस्तारण्याची इच्छा होती. याउलट, रक्षित शेट्टीचे लक्ष प्रामुख्याने कन्नड सिनेसृष्टीवर होते. रश्मिकाच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेमुळे आणि दोघांच्या भविष्यातील नियोजनातील मोठ्या फरकामुळे हे नातं टिकणं कठीण झालं. रश्मिकाच्या आईनेही तेव्हा स्पष्ट केलं होतं की, हा निर्णय कोणाचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर दोघांच्या भविष्यासाठी घेतला आहे.
advertisement
ब्रेकअप झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटी एकमेकांवर चिखलफेक करतात, पण रश्मिका आणि रक्षितने खूप समंजसपणा दाखवला. रश्मिकाने तिला पहिला ब्रेक देणाऱ्या रक्षितबद्दल नेहमीच आदर व्यक्त केला, तर रक्षितनेही रश्मिकाच्या यशाचे नेहमीच कौतुक केले. सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होऊनही रक्षित शांत राहिला आणि त्याने आपल्या कामातून उत्तर दिले.
advertisement
आज रश्मिका मंदाना एक पॅन इंडिया स्टार बनली आहे. 'पुष्पा', 'ॲनिमल' सारख्या चित्रपटांनी तिला शिखरावर नेलं आहे. आता ती 26 फेब्रुवारीला विजय देवरकोंडासोबत उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार असून 4 मार्च रोजी भव्य रिसेप्शन होणार असल्याची माहिती समोर येत आहे. रश्मिका तिच्या आयुष्याच्या या नवीन आणि सुंदर प्रवासासाठी सज्ज झाली असली, तरी रक्षित शेट्टीसोबतचा तिची ती अधुरी प्रेमकहानी आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.








