advertisement

पिसाळलेल्या कुत्र्याचा दोन वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला, हादरवून सोडणारा CCTV व्हिडिओ

Last Updated:

अहिल्यानगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने २ वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केला.

कुत्र्याचा २ वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला
कुत्र्याचा २ वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला
हरिष दिमोटे, प्रतिनिधी, अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. डायमंड गल्लीत, जुना मंगळ बाजार परिसरातील होशिंग हॉस्पिटलजवळ पिसाळलेल्या कुत्र्याने २ वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केला.
सिद्रा इसरार शेख (वय २ वर्षे) ही लहान मुलगी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून, तिला तात्काळ Civil Hospital Ahmednagar येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेचा CCTV व्हिडिओही समोर आला असून सोशल मीडियावर तो वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरत आहे.
advertisement
[video width="1600" height="900" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/02/dogattack-1-2026-02-f9a69c10e4e1619269883c1a7c0a2d87.mp4"][/video]

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा, नागरिकांची मागणी

महापालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या मागणीचे वेळोवेळी निवेदने दिली आहेत. तरी देखील महापालिकेने मोकाट कुत्र्यांसंदर्भात कोणतीही कारवाई न केल्याने आजची ही घटना घडली असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली आहे.
advertisement

...नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार

मोकाट कुत्र्यांसंदर्भात तक्रारी देऊन देखील महापालिकेने दुर्लक्ष केल्याने आजची घटना घडली आहे. महापालिकेने लवकरात लवकर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा घडलेल्या घटनेला महापालिका व कुत्रे पकडणारी संस्था जबाबदार धरून या दोन्हीवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पिसाळलेल्या कुत्र्याचा दोन वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला, हादरवून सोडणारा CCTV व्हिडिओ
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement