Konkan Railway: शिमग्यासाठी धावणार विशेष ट्रेन! कोकण रेल्वेकडून अनारक्षित ट्रेन; कुठे असेल स्टॉप?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
कोकणामध्ये जाणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. शिमग्यानिमित्त कोकणवासीयांसाठी विशेष मेमू ट्रेन चालवली जाणार आहे.
ठाणे: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. शिमग्यानिमित्त कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वेकडून विशेष मेमू ट्रेन चालवल्या जाणार आहेत. दिवा ते चिपळूण या मार्गावर विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. कोकण रेल्वेने शिमग्यानिमित्त कोकणवासीय आपल्या गावी जात असतात. या काळामध्ये रेल्वे, बस आणि मुंबई गोवा महामार्ग हे तिन्ही साधनं एकदम फुल्ल असतात. या मार्गांवर प्रवास करायचा म्हटल्यावर कोकणवासीयांचे प्रवासादरम्यान तीन तेरा होतात.
विशेष मेमू ट्रेन केव्हा धावणार?
शिमगा सणावेळी कोकणवासीयांची होणारी गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने दिवा- चिपळूण- दिवा मार्गावर विशेष अनारक्षित मेमू ट्रेन चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही मेमू ट्रेन 1 मार्च 2026 ते 8 मार्च 2026 या दिवसांमध्ये अप आणि डाऊन अशा दोन्हीही मार्गांवर चालवली जाणार आहे. ही ट्रेन रात्री 11.25 वाजता दिवा जंक्शनवरून सुटणार आहे, जी दुसऱ्या दिवशी सकाळी 06.30 वाजता चिपळूण स्थानकावर पोहोचेल. तर हिच ट्रेन त्याचदिवशी दुपारी 03.30 वाजता चिपळून स्थानकावरून सुटेल जी त्याचदिवशी रात्री 23.10 मिनिटांनी दिवा स्थानकावर पोहोचेल.
advertisement
कोणत्या स्थानकांवर थांबणार?
खरंतर, कोकण रेल्वेने कोकणकरांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा निर्णय घेतला असून प्रवाशांची गर्दी पाहता सोयीचा निर्णय घेतला आहे. ज्यांचा गावी शिमग्यासाठी अचानक जायचा प्लॅन झाला असेल, तर ते जाऊ शकणार आहेत. दिवा- चिपळूण मेमू ट्रेन पुढील सर्व रेल्वे स्थानकावर थांबा घेत जाणार आहे. दिवा स्थानकापासून सुरू झालेली मेमू ट्रेन, निळजे, तळोजे, कळंबोली, पनवेल, सोमटणे, आपटा, जिते, पेण, कासू नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगांव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, कारंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी आणि चिपळूण, या सर्व स्थानकांवर ही मेमू ट्रेन थांबणार आहे. चिपळूण शेवटचं स्थानक असेल.
advertisement
दरम्यान, ही संपूर्ण मेमू ट्रेन जनरल डब्ब्यासारखीच असणार आहे. जशी नेहमीची ट्रेन आहे, त्याप्रमाणेच असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आधीच रिझर्व्हेशन करावे लागणार नाही. प्रवास करण्यापूर्वीच प्रवाशांना तिकिट काढूनच पुढे प्रवास करावा लागणार आहे. ही मेमू ट्रेन फक्त शिमगा सणानिमित्त धावणार आहे. फक्त आठ दिवसच प्रवाशांना या ट्रेनमधून प्रवास करायला मिळणार आहे. 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी पर्यंत कोकणवासीयांना प्रवास करता येणार आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 9:52 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Konkan Railway: शिमग्यासाठी धावणार विशेष ट्रेन! कोकण रेल्वेकडून अनारक्षित ट्रेन; कुठे असेल स्टॉप?







