Navi Mumbai International Airport: नवी मुंबई विमानतळावरून थेट गोव्याला जा! इंडिगोची 6 शहरांसाठी सेवा सुरू, तिकीट किती?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशातल्या आणखीन काही प्रमुख शहरांमध्ये विमानसेवा नव्याने सुरू होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. डिसेंबर 2025 पासून सुरू झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशातल्या काही मोजक्याच ठिकाणी विमानसेवा पुरवली जात होती. आता अशातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशातल्या आणखीन काही प्रमुख शहरांमध्ये विमानसेवा विस्तारली जाणार आहे. येत्या 29 मार्चपासून ही सुविधा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू होणार आहे, कोणकोणत्या शहरामध्ये ही सेवा सुरू होणार आहे, जाणून घेऊयात...
विमानसेवेमध्ये वाढ
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, 29 मार्च 2026 पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबाद, दीव, गोवा, राजकोट, बेलगाम आणि कोल्हापूर अशा प्रमुख सहा शहरांमध्ये ही विमानसेवा पुरवली जाणार आहे. एटीआर एअरक्राफ्ट एअरलाइनने दिलेल्या अधिकृत निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, जाहीर केलेल्या नवीन मार्गांवर एटीआर विमानांचा वापर केला जाणार आहे. प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि नवी मुंबईमधून त्या एअरलाईन्सचे विमान वाढवायचे आहे. या निर्णयामुळे मेट्रोद्वारे टीयर 2 आणि टीयर 3 शहरांमध्ये प्रवास करणे सोपे होईल.
advertisement
बुकिंग प्रोसेस केव्हापासून सुरू होणार?
या फ्लाईट्सची बुकिंग प्रोसेस अद्याप सुरू झालेली नाही. तिकिटे इंडिगो वेबसाईटवर, मोबाईल ॲपवर आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईहून उड्डाणे वाढवणे हे त्यांच्या एटीआर नेटवर्कचा विस्तार करून पर्यटनाला चालना देण्याच्या, प्रादेशिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या आणि लहान शहरांपासून मोठ्या शहरांमध्ये जलद प्रवास सुलभ करण्याच्या मोठ्या धोरणाचा एक भाग आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला एक प्रमुख विमान वाहतूक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. यामुळे मुंबई विमानतळावरील गर्दी कमी होण्यास देखील मदत होईल.
advertisement
दरम्यान, इंडिगोने फेब्रुवारी 2026 च्या सुरुवातीला वाइड- बॉडी विमानांच्या ऑपरेशनवरील काही अडचणींमुळे लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये तात्पुरते बदल जाहीर केले. 17 फेब्रुवारी 2026 पासून अनिश्चित काळासाठी कोपनहेगनला जाणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली आहे. दिल्ली- मँचेस्टर आणि दिल्ली- लंडन हीथ्रो मार्गावरील उड्डाणांची संख्या सुद्धा कमी करण्यात आली आहे. कंपनीने म्हटले आहे की, ज्या प्रवाशांचे विमान रद्द करण्यात आले आहे, त्यांना पर्यायी प्रवास किंवा तिकिटाचे पैसे परत केले जाणार आहे.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 10:23 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Navi Mumbai International Airport: नवी मुंबई विमानतळावरून थेट गोव्याला जा! इंडिगोची 6 शहरांसाठी सेवा सुरू, तिकीट किती?










