मोदींचा ब्रँड सोशल मीडियावर सुपरहिट! इंस्टावर 100 मिलियन्सचा टप्पा, दुसऱ्या स्थानावर कोण?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
100 मिलियन्सचा टप्पा गाठणारे पीएम मोदी ठरले पहिले नेते, डोनाल्ड ट्रम्प यांनाही टाकलं मागे, तिसऱ्या स्थानावर कोण?
जगभरातील बड्या नेत्यांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता सोशल मीडियाच्या जगातही आपलं एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलं. नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता फक्त राजकारणापुरती मर्यादीत न राहता ती सोशल मीडियावरही त्यापेक्षा जास्त असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. नरेंद्र मोदी यांचे फॅनपेज बरेच आहेत मात्र त्यांच्या वैयक्तीक सोशल मिडिया अकाउंटवरही फॉलोअर्स वाढले आहेत. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
पीएम नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सचा आकडा आता १०० मिलियनपर्यंत पोहोचला आहे, सोप्या भाषेत सांगायचं तर १० कोटींहून अधिक लोक त्यांना फॉलो करत आहेत. विशेष म्हणजे, असा ऐतिहासिक टप्पा गाठणारे ते जगातील पहिलेच राजकारणी आणि जागतिक नेते ठरले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगातील इतर पाच प्रमुख नेत्यांच्या एकत्रित फॉलोअर्सपेक्षाही मोदींचा वैयक्तिक आकडा मोठा आहे.
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. मोदींच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्याने १०० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला असून, अशी कामगिरी करणारे ते जगातील पहिले जागतिक नेते आणि राजकारणी ठरले आहेत. विशेष म्हणजे, जगातील पहिल्या ५ प्रमुख नेत्यांच्या एकत्रित फॉलोअर्सची संख्या जितकी आहे, त्यापेक्षा एकट्या मोदींच्या फॉलोअर्सची संख्या जास्त आहे.
advertisement

जागतिक नेत्यांमध्ये मोदीच किंग
जगभरातील बड्या नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान मोदींचे फॉलोअर्स कितीतरी पटीने जास्त आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार
पंतप्रधान नरेंद्र मोदी- १०० मिलियन
डोनाल्ड ट्रम्प (अमेरिका)- ४३.२ मिलियन
प्रबोवो सुबियांतो (इंडोनेशिया- १५ मिलियन
लुला डी सिल्व्हा (ब्राझील)- १४.४ मिलियन
रेसेप तय्यप एर्दोगान (तुर्की)- ११.६ मिलियन
advertisement
२०१४ पासून लोकप्रियतेचा आलेख चढताच
पंतप्रधान मोदींनी २०१४ मध्ये इन्स्टाग्रामवर आपलं खातं सुरू केलं होतं. गेल्या १० वर्षांत त्यांनी या माध्यमातून तरुणाईशी आणि जागतिक समुदायाशी संवाद साधला. त्यांच्या परदेश दौऱ्यांचे फोटो, महत्त्वाच्या घोषणा आणि वैयक्तिक आयुष्यातील काही क्षण यामुळे त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख सतत वाढत राहिला.
केवळ जागतिक स्तरावरच नाही, तर भारतातील इतर राजकीय नेत्यांच्या तुलनेतही मोदी खूप पुढे आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे १६.१ दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे १२.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. या नेत्यांच्या तुलनेत मोदींची आकडेवारी ही कित्येक पटीने मोठी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 8:05 AM IST
मराठी बातम्या/देश/
मोदींचा ब्रँड सोशल मीडियावर सुपरहिट! इंस्टावर 100 मिलियन्सचा टप्पा, दुसऱ्या स्थानावर कोण?








