advertisement

Marathi Serial TRP : सायलीचा नाद नाय करायचा! तेजश्री प्रधानवर भारी पडली 'कमळी', TRP मध्ये कोणी मारली बाजी?

Last Updated:

Marathi Serial TRP Update : नेहमी प्रमाणे स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. TRP मध्ये आणखी कोणी कोणी बाजी मारली आहे पाहूयात.

News18
News18
मराठी मालिका विश्वात अनेक नव्या मालिका सुरू होत आहेत. पण ज्या मालिका सुरू आहेत त्यांच्यात देखील चांगलीच रेस लागली आहे. प्रत्येक आठवड्यात कोणती मालिका TRP च्या शर्यतीत वरचढ ठरणार याकडे सर्वांचं लक्ष असतं. या आठवड्याचा मालिकांचा TRP अपडेट समोर आला आहे. नेहमी प्रमाणे स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. मालिका सर्वाधिक TRP सह नंबर वनवर आहे.
BARC इंडियाच्या 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 च्या TRP नुसार, ठरलं तर मग मालिका गेली अनेक वर्ष नंबर वनवर आहे. मालिकेचं उत्तम कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवतंय. या आठवड्यात मालिका 4.3 TRP रेटिंगसह पहिल्या नंबरवर आहे. तर दुसऱ्यावर क्रमांकावर तू ही रे माझा मितवा ही मालिका आहे. मालिकेला 4.1 TRP रेटिंग इतकं रेटिंग मिळालं आहे.
advertisement
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरची मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले देखील प्रेक्षकांचं मनं जिंकत आहे. या आठवड्यात ही मालिका  3.5 TRP रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर  लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेला 3.3 TRP रेटिंग मिळालं असून मालिका चौथ्या क्रमांकावर आहे.
advertisement
तुझ्या सोबतीने या मालिकेला 3.3, वचन दिले तू मला  3.0, घरोघरी मातीच्या चुली  2.3 आणि  येड लागलं प्रेमाचं या मालिकेला 1.09 TRP रेटिंग मिळालं आहे.
स्टार प्रवाहनंतर झी मराठीच्या मालिकांचा TRP रेटिंग पाहायला गेल्यास, कमळी  3.8 TRP रेटिंगसह पुढे आहे. तिनं तेजश्री प्रधानच्या मालिकेला टक्कर दिली आहे.  तारिणी 3.6 TRP रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेजश्री प्रधानची वीण दोघांतली ही तुटेना ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर असून मालिकेला 3.5 TRP रेटिंग मिळालं आहे.
advertisement
लक्ष्मी निवास 3.3,  देवमाणूस 3.1,  तुला जपणार आहे 2.5, शुभ श्रावणी  2.3 आणि सावळ्याची जणू सावली  या मालिकेला 1.08 TRP रेटिंग मिळालं आहे.
या सगळ्या मालिकांमध्ये टॉप 5 मध्ये पुढील मालिका आहेत. 
  1. ठरलं तर मग 4.3 TRP रेटिंग
  2. तू ही रे माझा मितवा - 4.1 TRP रेटिंग
  3. कमळी - 3.8  TRP रेटिंग
  4. तारिणी - 3.6 TRP रेटिंग
  5. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले - 3.5  TRP रेटिंग आणि वीण दोघांतली ही तुटेना - 3.5 TRP रेटिंग
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Marathi Serial TRP : सायलीचा नाद नाय करायचा! तेजश्री प्रधानवर भारी पडली 'कमळी', TRP मध्ये कोणी मारली बाजी?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement