advertisement
LIVE NOW

Afghanistan vs Pakistan war Live: युद्धाची घोषणा, काबूल कंधारवर हवाई हल्ले

Last Updated:

Afghanistan vs Pakistan war Live Update : पाकिस्ताननं पुन्हा एकदा कुरघोडी केली आहे. आधीच सीमा संघर्ष सुरू असताना आता दहशतवादी असल्याचं सांगून पाकिस्ताननं अफगाणिस्तानमध्ये घुसून एअरस्ट्राइक केला. यामध्ये अफगाणिस्तानच्या काही नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. याचं योग्य उत्तर दिलं जाईल असा इशारा अफगाणिस्तान-तालिबानने दिला आणि त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा अफगाणिस्ताननं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सैन्याच्या तळांना टार्गेट केलं. बॉम्ब हल्ले आणि तोफगोळ्यांनी हल्ला चढवला. आतापर्यंत १९ पाकिस्तानी सैन्याच्या तळांवर कब्जा मिळवल्याचा दावा अफगाणिस्ताननं केला आहे. याशिवाय पाकिस्तानचे 55 सैनिक मारल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या सगळ्यानंतर डिचवलेल्या आणि चिडलेल्या पाकिस्तानने ओपन वॉरची घोषणा केली. दोन्ही देशांमध्ये सध्या संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

News18
News18
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या संघर्ष सुरू झाला आहे. पाकिस्तानने ओपन वॉरची घोषणा केली. सीमेवरील तणाव आणि दहशतवादी कारवायांच्या मुद्द्यावरून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. काबूलमधील स्फोटांच्या घटनेनंतर काही तासांतच पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील अनेक शहरांमध्ये थेट हवाई हल्ले करत तालिबान सरकारला मोठा दणका दिला आहे. या हल्ल्यांमध्ये तालिबानचे अनेक लष्करी तळ आणि मुख्यालये उद्ध्वस्त झाल्याचा दावा पाकिस्तानने केला.

पाकिस्तानी माहिती मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी वायूसेनेच्या विमानांनी अफगाणिस्तानमधील काबूल, कंधार आणि पक्तिया या प्रमुख प्रांतांना लक्ष्य केले. पाकिस्तानच्या 'पीटीव्ही न्यूज' या राज्य प्रसारकाने दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यांची तीव्रता प्रचंड होती. हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. आमचे सैन्य कोणत्याही आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे. जे लोक आमच्या संयमाला आमचा कमकुवतपणा समजतात, त्यांना कडक शब्दांत उत्तर दिले जाईल आणि कोणालाही सोडले जाणार नाही, असा कडक इशारा झरदारी यांनी दिला आहे.
Feb 27, 20268:52 AM IST

अफगाणिस्तानकडून 19 चौक्या ताब्यात, पाकला थेट प्रत्युत्तर

अफगाणिस्तानने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर कब्जा केला असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पाकिस्तान सैन्याच्या चौकीला आग लावतानाचा हा व्हिडीओ आहे. खोस्त परिसरातील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे.

Feb 27, 20268:50 AM IST

अफगाणिस्तानशी ओपन वॉर

पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी अफगाण तालिबान राजवटीला उघड इशारा देत म्हटले आहे की, “आता आमच्या आणि तुमच्यामध्ये ओपन वॉर होईल.” सीमेवर सुरू असलेल्या तणाव आणि लष्करी संघर्षांच्या दरम्यान हे विधान पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केलं आहे.

Feb 27, 20268:49 AM IST

पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांकडून इशारा

अफगाणिस्तानच्या प्रत्युत्तर हल्ल्यानंतर, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की “आमचा संयम संपला आहे,” आणि आता दोघांमध्ये उघड युद्ध होईल. त्यांच्या विधानात त्यांनी म्हटले आहे की, “आता दमादम मस्त कलंदर होईल,” जे इस्लामाबादच्या कठोर भूमिकेचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

advertisement
मराठी बातम्या/विदेश/
Afghanistan vs Pakistan war Live: युद्धाची घोषणा, काबूल कंधारवर हवाई हल्ले
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement