advertisement

IND vs ZIM : चुकीला माफी नाही! वेस्ट इंडिजविरुद्ध कॅप्टन सूर्या घेणार कठोर निर्णय! चेन्नईत खपवून घेतलं पण कोलकात्त्यात नाही

Last Updated:

Suryakumar Action on Sanju Wicketkeeping : टीम इंडियाचा स्टार ओपनर आणि विकेटकीपर संजू सॅमसन याने झिम्बाब्वेविरुद्ध एक दोन नाही तर तीन चुका केल्या. बॅटिंग तर संजूने फस्ट क्लास केली पण विकेटकिपिंगमध्ये संजूने घोडचुका केल्या.

Suryakumar Yadav Not happy over Sanju samson DRS Decisions
Suryakumar Yadav Not happy over Sanju samson DRS Decisions
India vs Zimbabwe T20 WC : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 72 धावांनी विजय मिळवला असून आता वेस्ट इंडिजविरुद्ध नॉक आऊट सामना खेळवला जाईल. अशातच आता टीम इंडियाने केलेल्या चुकांवर सूर्यकुमार पडदा टाकणार नसून कठोर निर्णय घेईल, अशी शक्यता आहे. कॅप्टन सूर्या पहिला निर्णय आपल्या आवडत्या खेळाडूविरुद्धच घेणार आहे. सूर्या संजू सॅमसनला दणका देणार असून त्याने झिम्बाब्वेविरुद्ध केलेल्या चुकांमुळे सूर्यकुमार नाराज असल्याचं पहायला मिळतंय.

एक दोन नाही तर तीन चुका

टीम इंडियाचा स्टार ओपनर आणि विकेटकीपर संजू सॅमसन याने झिम्बाब्वेविरुद्ध एक दोन नाही तर तीन चुका केल्या. बॅटिंग तर संजूने फस्ट क्लास केली पण विकेटकिपिंगमध्ये संजूने घोडचुका केल्या ज्या सूर्यकुमार खपवून घेणार नाही. संजू डीआरएस घेताना चुकतोय, असं स्पष्ट चित्र दिसू लागलंय. संजूने सातव्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाचा एक डीआरएस वाया घालवला होता. तर 17 व्या ओव्हरमध्ये देखील अर्शदीपला विकेट मिळत असताना डीआरएस घेऊ नको, असं संजूने कॅप्टन सूर्याला सांगितलं होतं. त्यामुळे संजू डीआरएस घेताना चुकतोय, हे स्पष्ट झालं आहे.
advertisement

ईशान किशनला संधी मिळणार

अशातच आता ईशान किशनलाच आगामी सामन्यात विकेटकीपर म्हणून उभं केलं जाण्याची शक्यता आहे. विकेटकीपर फिल्डर म्हणून संजू खूप चांगला असता तरी त्याचं निरीक्षण टीम इंडियासाठी वर्ल्ड कप बुडवू शकतं. त्यामुळे आता ईशान किशन याच्यावरच जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर आता संजूला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.
advertisement

वेस्ट इंडिजविरुद्ध कशी असेल प्लेईंग इलेव्हन?

दरम्यान, संजू सॅमसनने बॅटिंगमध्ये कमालीचं प्रदर्शन केलं. त्याने 15 बॉलमध्ये 24 धावांची खेळी केली. तर संजूमुळे अभिषेक शर्मा देखील फॉर्ममध्ये आला. अभिषेकने 30 बॉलमध्ये 55 धावांची खेळी केली. तर वन डाऊनला आलेल्या ईशान किशनने 24 बॉलमध्ये 38 धावा चोपल्या. त्यामुळे आता वेस्ट इंडिजविरुद्ध देखील अशीच प्लेईंग इलेव्हन खेळवली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ZIM : चुकीला माफी नाही! वेस्ट इंडिजविरुद्ध कॅप्टन सूर्या घेणार कठोर निर्णय! चेन्नईत खपवून घेतलं पण कोलकात्त्यात नाही
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement