Chandra Grahan 2026: चंद्र ग्रहणानंतर या विधी चुकवू नका; घर आणि देव्हाऱ्याचे असे करून घ्या शुद्धीकरण
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Chandra Grahan 2026: फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे. ग्रहण काळात देवदर्शन किंवा पूजापाठ वर्ज्य असल्याने मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात. ग्रहण सुटल्यानंतर मात्र घर आणि मंदिराचं शुद्धीकरण करणं अत्यंत गरजेचं मानलं जातं.
मुंबई : हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहण ही एक महत्त्वाची पण अशुभ घटना मानली जाते. यावर्षी म्हणजेच 3 मार्च 2026 ला फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे. ग्रहण काळात देवदर्शन किंवा पूजापाठ वर्ज्य असल्याने मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात. ग्रहण सुटल्यानंतर मात्र घर आणि मंदिराचं शुद्धीकरण करणं अत्यंत गरजेचं मानलं जातं. ग्रहण संपल्यानंतर घर, मंदिर आणि किचन कशा पद्धतीने शुद्ध करावं, याची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
देव्हारा कसा शुद्ध करावा?
ग्रहण संपल्यानंतर सर्वात आधी स्वतः स्नान करावं आणि मगच देव्हाऱ्याला हात लावावा. देव्हाऱ्याची स्वच्छता करताना काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात. पूर्ण देव्हारा स्वच्छ करून त्यावर गंगाजल शिंपडावं. मूर्तींवरून किंवा फोटोंवरून झाकलेलं कापड काढून टाकावं. सर्व मूर्तींना स्वच्छ पाण्याने आणि गंगाजलाने स्नान घालून त्यांची पुन्हा स्थापना करावी. देवाला ताजी फुलं, नवीन वस्त्र आणि नैवेद्य अर्पण करावा. शुद्धीकरण पूर्ण झाल्यावर देवाची आरती करावी आणि मगच रोजची पूजा सुरू करावी.
advertisement
किचनचं शुद्धीकरण कसं करावं?
ग्रहण संपल्यावर स्वयंपाकघर म्हणजेच किचनची स्वच्छता करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. गॅस शेगडी, ओटा आणि वापरलेली भांडी नीट घासून स्वच्छ करावीत. ग्रहण लागण्यापूर्वीच अन्नामध्ये तुळशीची पानं टाकून ठेवावीत, जेणेकरून ते अन्न ग्रहणानंतरही खाण्यायोग्य राहतं. किचन स्वच्छ झाल्यावरच सात्विक जेवण बनवावं.
advertisement
संपूर्ण घराचं शुद्धीकरण कसं करावं?
ग्रहणामुळे निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पूर्ण घर शुद्ध करणं गरजेचं असतं. पाण्यात चिमूटभर मीठ टाकून पूर्ण घराला पोछा लावावा किंवा घर धुवून घ्यावं. त्यानंतर पूर्ण घरात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावं. घरात धूप, अगरबत्ती किंवा शक्य असल्यास छोटा हवन करून वातावरण प्रसन्न करावं.
advertisement
ग्रहणानंतर काय करावं?
ग्रहण सुटल्यानंतर दानधर्माला खूप महत्त्व आहे. स्नान आणि देवाची पूजा झाल्यावर आपल्या क्षमतेनुसार अन्न, वस्त्र किंवा पैशांचं दान करावं. या दिवशी भुकेलेल्यांना जेवण देणं खूप शुभ मानलं जातं. जवळच्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेणं उत्तम असतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 10:16 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Chandra Grahan 2026: चंद्र ग्रहणानंतर या विधी चुकवू नका; घर आणि देव्हाऱ्याचे असे करून घ्या शुद्धीकरण









