Solapur News: पत्नीला मेसेज केला, पतीचं डोकं फिरलं, मित्रावरच गोळीबार, सोलापूर हादरलं!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Solapur News: पत्नीला गावाकडच्या मित्रानं मेसेज केला म्हणून पुण्यातील पतीनं गाव गाठलं. आता पोलीस शोध घेत आहेत.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर: मैत्रिणीला मेसेज केला म्हणून संतापलेल्या तिच्या पतीने मित्रावर गोळीबार केला. बार्शीतील कुसळंब येथे हा धक्कादायक प्रकार घडला. बाळासाहेब नंदकुमार उकिरडे (वय 24) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर योगेश भास्कर मोरे (वय 28) याच्यासह तिघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नेमकं घडलं काय?
बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे मित्राने पत्नीला मेसेज पाठवल्याच्या रागातून तिच्या पतीने टोकाचं पाऊल उचललं. पुण्यातून मित्रांसह येत बाळासाहेब उकिरडे याच्यावर गोळीबार करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. परंतु, दैव बलवत्तर म्हणून या हल्ल्यातून तरुणाचा जीव वाचला.
advertisement
गावकऱ्यांना धमकावले
हल्लेखोरांनी गावकरी आणि उकिरडे यांच्या कुटुंबीयांना देखील पिस्तूल दाखवत धमकावले आणि घटनास्थळावरून पसार झाले. परंतु, पुन्हा 15 मिनिटांनी येऊन ते गोळीच्या पुंगळ्या आणि रॉड घेऊन ते पुण्याकडे निघून गेले. यावेळी त्यांनी जखमीला जिवे मारण्याची धमकी दिली. बाळासाहेब उकिरडेवर बार्शीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते पोलीस भरतीचा सराव करत असून कडब्याचा व्यवसाय करतात.
advertisement
फरार आरोपींचा शोध सुरू
दरम्यान, गोळीबार आणि मारहाणीच्या घटनेनंतर योगेश मोरेसह साथीदार फरार झाले. संशयितांच्या शोधासाठी फौजदार बालाजी वळसने, राजेंद्र मंगरुळे, राहुल बोंदर, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे धनाजी के कान व सिद्धेश्वर लोंढे यांची पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपी लवकरच पकडले जातील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 9:37 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Solapur News: पत्नीला मेसेज केला, पतीचं डोकं फिरलं, मित्रावरच गोळीबार, सोलापूर हादरलं!








