advertisement

सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले, सोलापुरात खळबळ

Last Updated:

अक्कलकोट तालुक्यात जावयाकडून सासऱ्याची हत्या करण्यात आली. हल्ला करणाऱ्या जावयाने आत्महत्याचा प्रयत्न केला. मृत पावलेल्या व्यक्तीचे दोन्हीही मुलं पोलीस खात्यात आहेत.

जावयाकडून सासऱ्याचा खून
जावयाकडून सासऱ्याचा खून
प्रीतम पंडित, प्रतिनिधी, अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंगळगी गावातील शेतात जावयाने सासऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. धारदार चाकूने वार करत त्यांची हत्या केली. त्यानंतर जावईने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोलापुरातील रुग्णालयात जावयावर उपचार सुरू आहेत.
घटनेत मृत व्यक्तीचे नाव सिकंदर मुलका शेख असे आहे तर आरोपी जावयाचे नाव सादिक सैफन दफेदार असे आहे. याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मयत सिकंदर शेख यांचा मुलगा आणि मुलगी पोलीस खात्यात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement

सासऱ्याचा खून, जावयाने स्वत:वरही वार करून घेतले

सादिक दफेदार याने शेतात सिकंदर शेख यांच्यावर धारदार चाकूने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

खून कोणत्या कारणातून झाला? पोलीस तपास सुरू

advertisement
घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या पंचनामा सुरू असून, नेमका खून कोणत्या कारणातून झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे मृत सिकंदर शेख यांची दोन्ही मुले पोलीस खात्यात आहे. त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. घटना कळल्याबरोबर दोन्ही मुलं मूळ गावी तातडीने निघाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले, सोलापुरात खळबळ
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement