Mangal Gochar 2026: मेष, सिंहसहित 6 राशींना होळीपर्यंत गुडन्यूज; मंगळ कुंभ राशीतून भाग्यचक्र फिरवणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mangal Gochar 2026 In Kumbh: भाग्याची साथ कोणाला कधी, कशी मिळेल हे सांगता येत नाही. काही राशीच्या लोकांचे नशीब अनपेक्षित चमकते. तसाच काहीसा योग आता जुळून आलाय. मंगळाने 23 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजून 33 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश केला. तिथे आधीच राहु, शुक्र, बुध आणि सूर्य हे ग्रह असल्यामुळे पंचग्रही योग आणि शुक्रादित्य योगासारखे शुभ योग तयार होत आहेत. याचा फायदा प्रामुख्याने मेष आणि सिंहसहित 6 राशींना होणार असून त्यांची यंदाची होळी अधिक आनंदात जाणार आहे.
मेष - मंगळ तुमच्या राशीच्या 11 व्या घरात आला आहे, ते धन आणि लाभाचे स्थान आहे. या बदलामुळे तुमच्या सुखात वाढ होईल आणि होळीचा सण खास ठरेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत तुमचे ट्युनिंग सुधारेल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर असून आर्थिक बाजू भक्कम होईल, पण अधिक उत्पन्नासाठी थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतील.शुभ अंक: 6शुभ रंग: गडद हिरवा
advertisement
वृषभ - मंगळ तुमच्या राशीच्या 10 व्या घरात गेला आहे, ते करिअर आणि प्रतिष्ठेचे स्थान आहे. तुम्हाला तुमची गुणवत्ता सिद्ध करण्याची चांगली संधी मिळेल. कुटुंबासोबत तुम्ही होळीचा उत्साह साजरा कराल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या जुन्या मेहनतीमुळे ऑफिसमध्ये मान-सन्मान आणि नवी ओळख मिळेल.शुभ अंक: 14शुभ रंग: नेव्ही ब्लू
advertisement
advertisement
advertisement
advertisement








