Air Ambulance Crash : टेकऑफनंतर 20 मिनिटांनी संपर्क तुटला, दिल्लीला जाणाऱ्या एअर ॲम्ब्युलन्ससोबत 7:34 ला काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Jharkhand Air Ambulance Crash : रांचीहून दिल्लीला जाणारे एक चार्टर्ड विमान कोसळून भीषण अपघात झालाय. अवघ्या 23 मिनिटांत म्हणजेच 7:34 वाजता विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला.
झारखंडमधून धक्कादायक माहिती समोर आलीये. रांचीहून दिल्लीला जाणारे एक चार्टर्ड विमान कोसळून भीषण अपघात झाला असून, यामध्ये विमानातील सर्व 7 जणांचा मृत्यू झाला आहे. चार्टर्ड विमान रेडबर्ड कंपनीचे 'बीचक्राफ्ट किंग एअर B90L' मॉडेल असून ते एअर ॲम्ब्युलन्स म्हणून वापरले जात होते, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान, लातेहार जिल्ह्यातील चंदवा येथील रहिवासी असलेले संजय कुमार 65 टक्के भाजले होते. त्यांच्यावर 16 फेब्रुवारीपासून उपचार सुरू होते, मात्र अधिक उपचारांसाठी त्यांना दिल्लीला नेण्यात येत होते. रुग्णाच्या नातेवाईकांनीच या खासगी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती, पण नियतीला काही वेगळेच मान्य होतं.








