advertisement

Pune Congress BJP Clash: काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण, भाजप कार्यकर्त्यांवर आरोप, पुणे पोलिसांनी दिली महत्त्वाची अपडेट

Last Updated:

Congress BJP Clash: हिंदुत्ववादी कार्यकर्ते, भाजपपूरक भूमिका मांडणारे तुषार दामगुडे यांनी बंदुकीचा धाक दाखवून हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसने केला

काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण, भाजप कार्यकर्त्यांवर आरोप, पुणे पोलिसांनी दिली महत्त्वाची अपडेट
काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण, भाजप कार्यकर्त्यांवर आरोप, पुणे पोलिसांनी दिली महत्त्वाची अपडेट
पुणे: काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण झाल्याची घटना सोमवारी पुण्यात घडली. हिंदुत्ववादी कार्यकर्ते, भाजपपूरक भूमिका मांडणारे तुषार दामगुडे यांनी बंदुकीचा धाक दाखवून हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ ट्वीट केला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त करण्यात आली. पुणे पोलिसांनी आता या प्रकरणात महत्त्वाची अपडेट दिली आहे.

नेमकी घटना काय?

हनुमंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका टीव्ही डिबेटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित केल्याने भाजप कार्यकर्ते संतापले होते. स्टुडिओच्या बाहेर पडल्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. "तुषार दामगुडे यांनी कमरेला लावलेले पिस्तूल दाखवून मला धमकावले," असा आरोप पवार यांनी केला आहे. "पुण्यात जिवंत फिरायचे असेल तर भाजपविरोधात बोलायचे नाही," अशी तंबी दामगुडे यांच्या सहकाऱ्यांनी दिल्याचे पवार म्हणाले.विचारांची लढाई विचारांनी लढण्याऐवजी ४ ते ५ जणांनी मिळून छातीवर आणि तोंडावर मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. "मी अशा धमक्यांना आणि पिस्तुलाला भीक घालत नाही, असे म्हटल्यावर त्यांनी थेट माझ्यावर हल्ला चढवला. ही कसली पद्धत आहे?" असेही हनुमंत पवार यांनी म्हटले.
advertisement

पोलिसांनी दिली अपडेट...

या घटनेनंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिमंडळ २ चे डीसीपी मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांत शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर मारहाण झाली. मारहाण करणारे हे तुषार दामगुडे याचे मित्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात वैचारिक मतभेदावरून थेट शस्त्राचा धाक दाखवून मारहाण झाल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Congress BJP Clash: काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण, भाजप कार्यकर्त्यांवर आरोप, पुणे पोलिसांनी दिली महत्त्वाची अपडेट
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement