T20 WC Semifinal : वेस्ट इंडिजच्या 107 रन्सच्या विजयाने टीम इंडियाला फायदा होणार की तोटा? सेमीफायनलचं रोमांचक समीकरण
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Team india Semifinal Qualification Scenario : टीम इंडियाला फक्त विजयी होऊन चालणार नाही तर त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. पण वेस्ट इंडिजचा विजय टीम इंडियासाठी नक्कीच फायद्याचा ठरू शकतो.
Zimbabwe vs West Indies : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील सुपर 8 फेरीत मोठा उलटफेर पहायला मिळाला. ग्रुप ऑफ डेथमधील वेस्ट इंडिज आणि झिम्बॉब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने मोठ्या फरकाने झिम्बॉब्वे संघाचा पराभव केलाय त्यामुळे आता त्यांचा नेट रनरेट +5.350 इतका झालाय. त्यामुळे पाईंट्स टेबलमध्ये सध्या मोठा उलटफेर पहायला मिळतोय. साऊथ अफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांनी मोठ्या फरकाने सामने जिंकले असल्याने आता दोन्ही संघांचा नेट रनरेट स्ट्रॉग आहे. त्यामुळे टीम इंडियाला जर सेमीफायनलमध्ये जायचं असेल तर त्यांना फक्त विजयी होऊन चालणार नाही तर त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. पण वेस्ट इंडिजचा विजय टीम इंडियासाठी नक्कीच फायद्याचा ठरू शकतो.
झिम्बॉब्वे जवळपास स्पर्धेतून बाहेर
टीम इंडियाने उर्वरित दोन्ही सामने जिंकले, असं गृहित धरून चाललं तर... वेस्ट इंडिजने झिम्बॉब्वेला जवळपास स्पर्धेतून बाहेर केलंय, असं म्हणण्यास वाव आहे, आता एक टीम सेमीफायनलमधून बाहेर गेली. अशातच साऊथ अफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यापैकी एका टीमचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे पराभूत टीमचा नेट रनरेट देखील कमी होईल. इथंच टीम इंडियाला संधी साधायची आहे.
advertisement
26 तारखेच्या मॅचवरून ठरणार टीम इंडियाचं भविष्य
जर वेस्ट इंडिजने साऊथ अफ्रिकेचा पराभव केला (जे शक्य नाही) तर साऊथ अफ्रिका आणि टीम इंडिया यांच्यात ज्याचा नेट रनरेट चांगला असेल त्याला सेमीफायनलमध्ये संधी मिळेल. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजचा साऊथ अफ्रिकेकडून पराभव झाला. तर टीम इंडियाला नेट रनरेटने जिंकण्याची गरज पडणार नाही. 26 तारखेच्या मॅचवरून टीम इंडियाचं भविष्य ठरणार आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
advertisement
टीम इंडियाला गाशा गुंडाळावा लागणार
दरम्यान, साऊथ अफ्रिकेचा वेस्ट इंडिजकडून अतितटीच्या लढतीत पराभव झाला तर टीम इंडियाला नक्कीच गाशा गुंडाळावा लागणार आहे. यामुळे वेस्ट इंडिजचा विजय टीम इंडियासाठी फायदाही ठरू शकतो आणि तोटाही... येत्या 26 फेब्रुवारीला टीम इंडियाच्या आगामी रणनितीचा विचार करावा लागणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 7:39 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 WC Semifinal : वेस्ट इंडिजच्या 107 रन्सच्या विजयाने टीम इंडियाला फायदा होणार की तोटा? सेमीफायनलचं रोमांचक समीकरण










