Thane Traffic : मोठी बातमी! ठाणे शहरातील मुख्य रस्ते 31 मार्चपर्यंत बंद; पर्यायी मार्ग कोणते?
Last Updated:
Thane Traffic Update : ठाणे शहरातील वाहनचांलकासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. जिथे शहरातील काही भागात रस्ते बंद राहणार आहेत.
ठाणे : ठाण्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. शहरातील काही महत्त्वाच्या परिसरातील रस्ते हे काही दिवस बंद राहणार आहेत, त्यामुळे वाहनचालकांनी सर्व अपडेट सविस्तर जाणून घ्या.केव्हा आणि किती दिवस तसेच कोणकोणते मार्ग बंद करण्यात आलेले आहेत.
प्रवासापूर्वी हे वाचा
मिळालेल्या माहितीनुसार,ठाणे शहरातील पाणीपुरवठा पाइपलाइनच्या कामामुळे 23 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत रवी स्टील नाका ते माजिवडा मेट्रो स्टेशन आणि रवी स्टील नाका ते कॅडबरी जंक्शन (ज्युपिटर मार्गे) या दरम्यानचा सेवा रस्ता बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तात्पुरती वळवण्यात येणार आहे.
या कामादरम्यान हार्दासनगर कट येथे वाहतुकीचे वळण देण्यात येईल. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
जाणून घ्या पर्यायी मार्ग
1)हार्दासनगर येथून डावीकडे वळून वसंत लॉन्ससमोरील रस्ता वापरावा.
2)ज्युपिटर कटवरून उजवीकडे वळून ज्युपिटर हॉस्पिटलसमोरील स्लिप रोड घ्यावा.
3)लोढा कासा किंवा टीसीएसकडून येणाऱ्या वाहनांनी हार्दासनगर येथे उजवीकडे वळावे.
या बदलामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासापूर्वी मार्गाची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे. शक्य असल्यास पर्यायी रस्त्यांचा वापर करावा आणि गर्दीच्या वेळा टाळाव्यात. प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 7:40 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Traffic : मोठी बातमी! ठाणे शहरातील मुख्य रस्ते 31 मार्चपर्यंत बंद; पर्यायी मार्ग कोणते?








