advertisement

Orange Peel Soap : संत्र्याच्या साली त्वचेसाठी असतात बेस्ट! फेकण्याऐवजी बनवा नैसर्गिक 'Vitamin C' रिच साबण

Last Updated:

Homemade Vitamin C rich Soap : बरेच लोक महागडे व्हिटॅमिन सी रिच सिरम आणि फेक वॉश वापरतात. तेही फायद्याचे असतात. पण जर आपल्याला स्वस्तात घरच्या घरी व्हिटॅमिन सी रिच साबण मिळत असेल तर आपण त्याचा फायदा का नको घ्यायला..

बनवा संत्र्याच्या सालींपासून साबण..
बनवा संत्र्याच्या सालींपासून साबण..
मुंबई : आपण आपल्या त्वचेची खूप काळजी घेतो. त्वचेवर कोणताही पदार्थ किंवा कोणतेही प्रोडक्ट वापरताना आपण अनेक वेळा विचार करतो. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आता हे नक्कीच माहित असेल की व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी किती गरजेचे आणि फायद्याचे असते. यासाठी आपण संत्री खाणं तर गरजेचंच असतं पण ती चेहऱ्यावर बाहेरून वापरणं देखील फायद्याचा ठरू शकतं.
यासाठी बरेच लोक महागडे व्हिटॅमिन सी रिच सिरम आणि फेक वॉश वापरतात. तेही फायद्याचे असतात. पण जर आपल्याला स्वस्तात घरच्या घरी व्हिटॅमिन सी रिच साबण मिळत असेल तर आपण त्याचा फायदा का नको घ्यायला.. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट DIY व्हिटॅमिन सी रिच साबण कसा बनवायचा ते सांगणार आहोत.
advertisement
संत्र्याच्या सालीपासून बनवलेल्या या साबणामध्ये कोणतेही कठोर रसायन नाही, कोणतेही कृत्रिम रंग नाहीत. फक्त संत्र्यांचा ताजेपणा आणि सौम्य एक्सफोलिएटिंग गुणधर्म आहेत. विशेष म्हणजे, तुम्ही घरी मिळणाऱ्या साध्या घटकांचा वापर करून तुमचा स्वतःचा सुगंधित साबण तयार करू शकता. चला तर मग पाहूया संत्र्याच्या सालीचा साबण कसा बनवायचा.
साबण बनवण्यासाठी साहित्य..
- 4 ते 5 ताज्या संत्र्याच्या साली
advertisement
- सुमारे 500 ग्रॅम ग्लिसरीन साबण बेस
- मिक्सर किंवा ग्राइंडर
- चाळणी
- उकळत्या पाण्यासाठी डबल बॉयलर किंवा भांडे
- सिलिकॉन मोल्ड
असा बनवा संत्र्याच्या सालींपासून साबण..
- प्रथम, संत्र्याच्या सालींचे लहान तुकडे करा. थोडे पाणी घाला आणि मिक्सरमध्ये बारीक करून एक गुळगुळीत पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चाळणीतून गाळून घ्या जेणेकरून खडबडीत तंतू वेगळे होतील आणि मऊ अर्क मिळेल.
advertisement
- आता ग्लिसरीन साबणाच्या बेसचे लहान तुकडे करा. डबल बॉयलर किंवा गरम पाण्याच्या भांड्यात हळूहळू वितळवा. बेस थेट जास्त आचेवर ठेवू नका. कारण ते जळू शकते.
- यानंतर साबणाचा बेस पूर्णपणे वितळला की, गाळलेल्या संत्र्याच्या सालीचे मिश्रण घाला. नीट मिसळण्यासाठी सुमारे एक मिनिट हलक्या हाताने ढवळून घ्या.
- तयार केलेले द्रव मिश्रण सिलिकॉन साच्यात घाला. रम टेम्परेचरवर 30-40 मिनिटे राहू द्या. थंड झाल्यावर साबण कडक होईल आणि साच्यातून सहज बाहेर पडेल.
advertisement
या घरगुती साबणाचे फायदे..
- हा घरगुती संत्र्याचा साबण हात धुण्यासाठी, चेहरा स्वच्छ करण्यासाठी किंवा आंघोळीसाठी वापरता येतो. नियमित वापरामुळे त्वचा स्वच्छ आणि ताजी वाटते.
- त्याचा ग्लिसरीन बेस त्वचेचा ओलावा राखण्यास मदत करतो, तर संत्र्याच्या सालीचा अर्क सौम्य एक्सफोलिएशन प्रदान करतो. याचा अर्थ त्वचा स्वच्छ आणि मऊ दोन्ही असते.
advertisement
- या साबणाचा सुगंध मूड फ्रेश करतो. विशेषतः सकाळी आंघोळीच्या वेळी नैसर्गिक सुगंधाने तुम्हाला प्रसन्न वाटते.
साबण आणखी प्रभावी बनवण्यासाठी टिप्स..
- संत्र्याची साल उन्हात वाळवून नंतर बारीक केल्याने सुगंध जास्त काळ टिकेल.
- थोडे नारळाचे तेल घातल्याने साबण मऊ होतो.
- रंगासाठी चिमूटभर हळद घालता येते.
- वाळलेल्या सालींची बारीक पावडर घातल्याने सौम्य स्क्रब इफेक्ट मिळतो.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Orange Peel Soap : संत्र्याच्या साली त्वचेसाठी असतात बेस्ट! फेकण्याऐवजी बनवा नैसर्गिक 'Vitamin C' रिच साबण
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement