advertisement

दिवसभर शिमगा पालखी होता अन् रात्री घरी गेल्यावर तो परतलाच नाही, रत्नागिरीतील हृदयद्रावक घटना

Last Updated:

 शिमगोत्सवाच्या निमित्ताने गावात पारंपरिक सोहळ्यांना उत्साहाचं वातावरण होतं. आकाश वेद्रे हा दिवसभर शिमगा पालखी सोहळ्यात सक्रिय सहभागी झाला होता

News18
News18
रत्नागिरी: कोकणामध्ये सध्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे, अशातच   रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ गावात शिमगोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव सुन्न झालं आहे. एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्याा माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ गावात ही घटना घडला आहे.  आकाश अरुण वेद्रे (वय २३) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.  या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. सणाच्या आनंदात रमलेल्या वातावरणावर अचानक दुःखाची सावली पसरली आहे.
दिवसभर शिमगा पालखीत सहभाग
शिमगोत्सवाच्या निमित्ताने गावात पारंपरिक सोहळ्यांना उत्साहाचं वातावरण होतं. आकाश वेद्रे हा दिवसभर शिमगा पालखी सोहळ्यात सक्रिय सहभागी झाला होता. मित्रांसोबत पारंपरिक खेळ, पालखीचा फेरफटका आणि उत्सवातील विविध कार्यक्रमात तो आनंदाने सहभागी झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. रात्री उशिरापर्यंत तो पालखी सोहळ्यात दिसत होता. मात्र मध्यरात्रीनंतर घरी परतल्यानंतर आकाशने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
advertisement
सकाळी जेव्हा कुटुंबीयांनी आकाशला आवाज दिला पण तो बराच वेळ झाला रूममधून बाहेर आला नाही. त्यामुळे रूममध्ये डोकावून पाहिले असता आकाशने गळफास घेतल्याचं लक्षात आलं. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीय आणि स्थानिकांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून घटनेचा तपास सुरू आहे.
advertisement
या घटनेमुळे शिमगोत्सवाच्या आनंदावर विरजण पडलं असून दाभोळ गावात शोककळा पसरली आहे. तरुणाच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. आकाश वेद्रे या तरुणाने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं, याचा शोध पोलीस घेत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दिवसभर शिमगा पालखी होता अन् रात्री घरी गेल्यावर तो परतलाच नाही, रत्नागिरीतील हृदयद्रावक घटना
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement