advertisement

आज होळी पण सुट्टी नक्की कधी, आज बँक सुरू राहणार की बंद? लगेच चेक करा

Last Updated:
होलिका दहनमुळे लखनऊ, कानपूरमध्ये बँका बंद, पण मुंबई, पुणे, दिल्लीमध्ये सुरू. ३ व ४ मार्चला देशभर बँकांना सुट्टी, मात्र डिजिटल सेवा आणि ATM सुरू राहतील.
1/5
मार्च महिना सुरू झाला असून सणासुदीच्या धामधुमीमुळे बँकांच्या सुट्ट्यांची मोठी यादी समोर आली आहे. आज सोमवार, २ मार्च २०२६ रोजी 'होलिका दहन' असल्याने अनेकांना प्रश्न पडलाय की, आज बँका सुरू आहेत की बंद? जर तुम्हाला चेक जमा करायचा असेल किंवा बँकेची इतर कामं असतील, तर घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरात सुट्टी आहे का, हे चेक करा

2/5
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमानुसार, आज उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये जसे की लखनऊ आणि कानपूर येथे होलिका दहन निमित्त बँका बंद राहणार आहेत. मात्र, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे यांसह दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये आज बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील. त्यामुळे मुंबई-पुणेकरांनी काळजी करण्याचे कारण नाही, तुमची बँकांची कामं आज होऊ शकतात.

3/5
होळीच्या सणामुळे पुढचे दोन-तीन दिवस देशाच्या वेगवेगळ्या भागात बँका बंद राहतील. ३ मार्च धुळवड आणि डोल जत्रेनिमित्त मुंबई, दिल्ली, कोलकाता, जयपूर आणि पाटणा या मोठ्या शहरांमध्ये बँका बंद असतील. ४ मार्च रोजी होळीचा मुख्य सण असल्याने मुंबई, नवी दिल्ली, लखनऊ, अहमदाबाद आणि चंदीगडसह जवळपास संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असेल.

4/5
जर तुम्हाला बँकेत प्रत्यक्ष जाऊन काही काम करायचे असेल, तर ते आजच उरकून घ्या, कारण उद्यापासून सलग सुट्ट्यांचे सावट आहे. मात्र, बँका बंद असल्या तरी तुमची डिजिटल कामं थांबणार नाहीत.

5/5
ATM सेवा: नेहमीप्रमाणे सुरू राहतील. ऑनलाईन बँकिंग गुगल पे, फोन पे (UPI), नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या सेवा २४ तास सुरू असतील. आज उत्तर प्रदेश सोडल्यास सर्वत्र बँका सुरू आहेत, पण उद्या (३ मार्च) आणि परवा (४ मार्च) महाराष्ट्रासह बहुतांश भागात बँकांना कुलूप असेल.

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement