advertisement

Coconut Water Myths : रिकाम्या पोटी नारळ पाणी पिणं सुरक्षित आहे का? ते रोज प्यावं का? डॉक्टरांनी सांगितलं सत्य

Last Updated:
Coconut water on empty stomach : नारळपाणी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते हे जवळपास सर्वानाच माहित आहे. मात्र हे नारळ पाणी रोज पिणं योग्य आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते रिकाम्या पोटी प्यावं का? चला जाणून घेऊया तज्ज्ञांकडून.
1/9
नारळ पाणी इतर पेयांच्या तुलनेत उन्हाळ्यात एक सुरक्षित आणि फायदेशीर पेय असते. डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी त्यापेक्षा उत्तम काहीच नाही. आज आपण या नारळ पाण्याविषयी काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत.

2/9
बरेच लोक निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर नारळ पाणी पितात. नारळ पाणी आपल्याला नैसर्गिक ऊर्जा देते आणि उन्हाळ्यात यामुळेच ते मोठ्या प्रमाणावर प्यायले जाते. डॉ. राजकुमार यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे.

3/9
डॉक्टरांनी सांगितलं की, नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक असतात. ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि डिहायड्रेशन टाळते. रिकाम्या पोटी ते प्यायल्याने ते शरीरात लवकर शोषले जाते, चयापचय सुधारतो आणि पोट हलके वाटते.

4/9
या कारणामुळे बरेच लोक डिटॉक्स ड्रिंक म्हणून नारळ पाण्याचा वापर करतात. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठीही नारळ पाणी फायदेशीर मानले जाते. यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यामुळे त्यांना बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे तुम्ही जास्त खात नाही आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. नियमित नारळपाणी प्यायल्याने त्वचा चांगली राहाते आणि शरीर फ्रेश राहते.

5/9
नारळ पाण्याचे अनेक फायदे असले तरी ते सर्वांसाठीच योग्य आहे, असे नाही. रिकाम्या पोटी नारळपाणी प्यायल्याने कमी रक्तदाब असलेल्या लोकांना चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब आणखी कमी करू शकते. अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच नारळपाणी प्यावं.

6/9
नारळ पाणी इतर पेयांच्या तुलनेत उन्हाळ्यात एक सुरक्षित आणि फायदेशीर पेय असते. डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी त्यापेक्षा उत्तम काहीच नाही. आज आपण या नारळ पाण्याविषयी काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत.
नारळ पाणी इतर पेयांच्या तुलनेत उन्हाळ्यात एक सुरक्षित आणि फायदेशीर पेय असते. डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी त्यापेक्षा उत्तम काहीच नाही. आज आपण या नारळ पाण्याविषयी काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत.
advertisement
7/9
मधुमेहाच्या रुग्णांनीही तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच नारळ पाणी प्यावं. कारण त्यामध्ये नैसर्गिक साखर असते. नारळपाणी शुद्ध साखर नसली तरी जास्त प्रमाणात प्यायल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. रिकाम्या पोटी प्यायल्याने ते जलद शोषले जाते. म्हणून रक्तातील साखरेचे नियमितपणे निरीक्षण करणे महत्वाचे आहे.

8/9
रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्याने काही लोकांना पोटदुखी, गॅस किंवा अगदी सौम्य अतिसाराचा त्रास होऊ शकतो. कमकुवत पचनक्रिया असलेल्यांनी सुरुवातीला कमी प्रमाणात सुरुवात करावी. मूत्रपिंडाचा त्रास असेल तर नारळ पाण्यातील जास्त पोटॅशियम हानिकारक ठरू शकते.

9/9
नेहमी ताजे आणि मर्यादित प्रमाणात नारळ पाणी पिणे, हीच योग्य पद्धत आहे. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पुरेसा आहे. नारळ पाणी खूप थंड किंवा शिळे घेऊ नये. तुम्हाला कोणताही आजारअसेल किंवा तुम्ही नियमित औषधं घेत असाल, तर तुमच्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement