advertisement

Dandruff Remedy : कितीही स्वच्छ केलं तरी केसांतील कोंडा वारंवार येतो? कडुलिंबाचे 'हे' उपाय सोडवतील समस्या..

Last Updated:
Neem remedies to remove dandruff : केसांच्या काही प्रमुख समस्यांपैकी एक समस्या असते ती म्हणजे कोंड्याची. कधी कधी हा कोंडा एका धुण्यानंतर निघून जातो, मात्र कधी कधी कितीही वेळा धुतल्यानंतर कोंडा निघतच नाही. अशावेळी काही घरगुती उपाय तुमची मदत करू शकतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक घरगुती सांगणार आहोत.
1/7
केसांमधील कोंड्यामुळे खाज सुटू शकते आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो. ही समस्या वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वारंवार कोंडा होणे हे टाळूमध्ये पोषणाच्या कमतरतेचे लक्षणदेखील आहे. यामुळे मुळांपासून केस कमकुवत होतात आणि वेगाने गळतात. मात्र या सर्वांवर एकच नैसर्गिक उपाय आहे. ते म्हणजे कडुलिंब.

2/7
आयुर्वेदामध्ये कडुलिंब केसांची थेरपी आहे, जी त्वचा आणि शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु कडुलिंब थेरपी केसांना पुनरुज्जीवित देखील करू शकते. आयुर्वेदात कडुलिंबाला सर्वरोगनिवारणी म्हणतात आणि त्याचा कडूपणा बॅक्टेरिया, बुरशी आणि जळजळ कमी करण्यास मदत करतो.

3/7
पहिला उपाय : कडुलिंबाचा काढा बनवा आणि त्याने केस धुवा. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळा आणि थंड झाल्यावर गाळा. केस शॅम्पूने धुतल्यावर ते कडुलिंबाच्या पुण्याने धुवा. यामुळे खाज कमी होईल आणि तुमची टाळू स्वच्छ होईल.

4/7
दुसरा उपाय : कडुलिंबाच्या तेलाचा वापर करा. यासाठी कडुलिंबाची पाने वाळवा. ती नारळाच्या तेलात उकळवून गाळून घ्या आणि हे तेल एका भांड्यात साठवा. आठवड्यातून दोनदा हे तेल तुमच्या केसांना लावा. नंतर तुमचे केस शॅम्पूने स्वच्छ धुवा. यामुळे टाळूवरील बॅक्टेरिया नष्ट होतील आणि केसांना मुळांपर्यंत पोषण मिळेल.

5/7
तिसरा उपाय : कडुलिंब पावडर हेअर मास्क वापरा. यासाठी कडुलिंब पावडर, दही आणि थोडा कोरफडीचा गर एकत्र करून केसांना लावा. अर्ध्या तासाने ते सुकल्यानंतर तुमचे केस धुवा. यामुळे तुमचे केस कंडीशन होतील आणि कोंडा कमी होण्यास मदत होईल.

6/7
चौथा उपाय : कडुलिंब आणि मेथीचा पॅक वापरा. हा पॅक तयार करण्यासाठी भिजवलेली मेथीचं दाणे धुतलेल्या कडुलिंबाच्या पानांसोबत बारीक करा आणि ते थेट तुमच्या केसांना लावा. या पॅकमुळे कोंडा आणि केस गळणे कमी होण्यास मदत होईल आणि टाळूवरील बॅक्टेरिया देखील कमी होतील.

7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement