advertisement

BMC Mega Bharti 2026 : मुंबई महापालिकेत मेगा भरती! 56 हजार पदं रिक्त; 9 हजार जागा भरण्याची प्रक्रिया सुसाट, बेरोजगारांना सुवर्णसंधी

Last Updated:

पालिकेच्या विविध विभागांमध्ये तब्बल ५६ हजारांहून अधिक पदे रिक्त असून, त्यापैकी सुमारे ९ हजार २९५ पदांची भरती प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहे

मुंबई महापालिकेत मेगा भरती
मुंबई महापालिकेत मेगा भरती
मुंबई: मुंबई महानगरपालिकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. पालिकेच्या विविध विभागांमध्ये तब्बल ५६ हजारांहून अधिक पदे रिक्त असून, त्यापैकी सुमारे ९ हजार २९५ पदांची भरती प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ७० हजार पदांच्या भरतीची घोषणा केल्यानंतर आता मुंबई पालिकेतील रिक्त जागा भरण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
रिक्त पदांचा तपशील आणि सद्यस्थिती
मुंबई महापालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, पालिकेच्या आस्थापनेवर एकूण १ लाख ४५ हजार २५६ मंजूर पदे आहेत. मात्र, सध्या केवळ ८९ हजार १३० कर्मचारी कार्यरत असून, तब्बल ५६ हजार १२६ पदे अद्याप रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामावर ताण येत असून, ही पदे तातडीने भरण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे.
advertisement
९ हजार पदांची प्रक्रिया प्रगतीपथावर
पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ९ हजार २९५ पदांच्या भरतीपैकी ५ हजार ४८६ पदांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित ३ हजार ८०९ पदे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर रिक्त पदे भरण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पत्राद्वारे ही भरती प्रक्रिया अधिक गतिमान करण्याची विनंती केली आहे.
advertisement
महसुली खर्चाचे आव्हान
एकीकडे भरतीची प्रक्रिया सुरू असली तरी, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात महसुली खर्च कमी करण्यासाठी काही पदे कमी करण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा आणि नागरी सुविधांच्या गरजा लक्षात घेऊन ही 'मेगा भरती' पूर्ण करणे पालिकेसमोर मोठे आव्हान असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Mega Bharti 2026 : मुंबई महापालिकेत मेगा भरती! 56 हजार पदं रिक्त; 9 हजार जागा भरण्याची प्रक्रिया सुसाट, बेरोजगारांना सुवर्णसंधी
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement