advertisement

Weather Alert : धुलीवंदनाला महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल, उष्णतेचा पारा आणखी चढणार, हवामान विभागचा अलर्ट

Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ नोंदली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर 3 मार्च धुलीवंदनाच्या दिवशीही राज्यात उष्ण आणि कोरडे हवामान राहणार आहे. कोकण ते विदर्भ हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/7
महाराष्ट्रातील हवामानात मार्चमध्ये मोठे बदल जाणवत आहेत. उन्हाचा पारा हळूहळू वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ नोंदली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर 3 मार्च धुलीवंदनाच्या दिवशीही राज्यात उष्ण आणि कोरडे हवामान राहणार आहे. कोकण ते विदर्भ हवामान अपडेट जाणून घेऊ.

2/7
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज उष्ण आणि दमट वातावरण राहील. आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवेल. मुंबईत कमाल तापमान सुमारे 29 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24 ते 26 अंश दरम्यान राहील. दुपारी सूर्यप्रकाश तीव्र असेल आणि समुद्रकिनारी भागात दमटपणा वाढलेला जाणवेल.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा परिसरात कमाल तापमान 31 ते 34 अंश, तर किमान तापमान 16 ते 19 अंश दरम्यान राहील. दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर उष्णतेची तीव्रता वाढेल.

4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमान वाढ होईल. नाशिकमध्ये दिवसा 33-35 अंश, तर किमान तापमान 18 ते 21 अंश दरम्यान राहील.

5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल 33-36 अंशांपर्यंत, किमान 18-21 अंश दरम्यान राहील.

6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणामध्ये सर्वाधिक उष्णता जाणवेल. कमाल 34-37 अंश, किमान 20-23 अंश राहील. दुपारच्या सुमारास कडक ऊन पडेल आणि उष्ण वाऱ्यांची हलकी झुळूक जाणवू शकते.

7/7
एकंदरीत 3 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात कोरडे आणि प्रामुख्याने उन्हाळी हवामान राहील. नागरिकांनी दुपारच्या वेळेत उन्हापासून काळजी घ्यावी आणि पुरेसे पाणी प्यावे, अशी सूचना करण्यात येत आहे.

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement