Tata Sierra, Thar आता विसरा, येतेय स्वस्तात दणकट गरिबांची डिफेंडर, किंमतही कमी, महाराष्ट्र कनेक्शन समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
विशेष म्हणजे, या JSW Motors Jetour T2 चं उत्पादन हे महाराष्ट्रात होणार आहे. चिनी कंपनीसोबत भागिदारी असली तरी छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन इथल्या प्लांटमध्ये असेंबल करणार आहे.
भारतात सध्या कारच्या किंमती कमी झाल्यामुळे SUV घेणे आता शक्य झालं आहे. त्यामुळे टाटा मोटर्स, महिंद्रा मोटर्स आणि हुंदईने स्वस्तात मस्त अशा SUV गाड्यांचा पर्याय दिलाा आहे. आता SUV सेगमेंटमध्ये एक धाकड एसयूव्ही येणार आहे. ही एसयूव्ही डिफेंडरची कॉपी आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. मजबूत, दणकट आणि महिंद्राच्या Thar ला थेट भिडणारी अशी JSW Motors ची Jetour T2 SUV लाँच होण्याच्या तयारीत आहे. या Jetour T2 चे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Jetour T2 च्या इंटिरिअरमध्ये Robust Steering Wheel, 15.6 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.25 इंचाची डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले दिला आहे. ही एक ५-सीटर एसयूव्ही असणार आहे. JSW Motors Jetour T2 मध्ये पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस चार्जर, Sony चे १२ स्पीकर ऑडिओ सिस्टम, पॉवर आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारखे प्रिमियम फिचर्स दिले जाणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विशेष म्हणजे, या JSW Motors Jetour T2 चं उत्पादन हे महाराष्ट्रात होणार आहे. चिनी कंपनीसोबत भागिदारी असली तरी छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन इथल्या प्लांटमध्ये असेंबल करणार आहे. हा एक ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या प्लांटला आधीपासून तयार केलं आहे. ६३० एकरमध्ये हा प्लांट असणार आहे. जवळपास या प्लांटमधून वर्षााला ५ लाख वाहनांची निर्मिती केली जाणार अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.









