advertisement

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी AI चा वापर करताय ? थांबा, ही माहिती आधी पूर्ण वाचा

Last Updated:

एआय टूल्स वजन कमी करण्याची प्रक्रिया खूप सोपी करतात. वजन कमी करण्यासाठी AI लगेच आहारात बदल सुचवतं. यामुळे तुमच्या कॅलरीज मोजणं शक्य होतं. तसंच AI तुम्हाला व्यायामाची आठवण करून देतं. हे फायदे असले तरी AI वापरण्याचे काही तोटे असू शकतात.

News18
News18
मुंबई : AI चा वापर आता प्रत्येक क्षेत्रात होतोय आणि तो घराघरात पोहोचलाय. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूमधे कृत्रिम बुद्धिमत्ता पोहोचली आहे.
कुठल्याही कामांसाठी, एखादी गोष्ट सोपी करण्यासाठी AI युक्ती देत असतं. ऑफिसचं काम असो किंवा वजन कमी करण्यासाठी AIचा वापर होतोय.
एआय टूल्स वजन कमी करण्याची प्रक्रिया खूप सोपी करतात. वजन कमी करण्यासाठी AI लगेच आहारात बदल सुचवतं. यामुळे तुमच्या कॅलरीज मोजणं शक्य होतं. तसंच AI तुम्हाला व्यायामाची आठवण करून देतं. हे फायदे असले तरी AI वापरण्याचे काही तोटे असू शकतात.
advertisement
AI वापरण्याचे काही तोटे
एआय खूप हुशार असलं तरी ते डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ नाही. म्हणून, वजन कमी करण्यासाठी डॉक्टरऐवजी एआयवर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं.
प्रत्येक व्यक्तीचं चयापचय, अनुवंशशास्त्र आणि वैद्यकीय इतिहास वेगवेगळा असतो. एआय बहुतेकदा उपलब्ध डेटावर आधारित एखादा सामायिक सल्ला देतं. AI ला तुमच्या शरीराच्या सूक्ष्म गरजा समजत नाही ज्या आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांना समजू शकतात.
advertisement
वैद्यकीय परिस्थितींकडे दुर्लक्ष - थायरॉईड, पीसीओडी, मधुमेह किंवा इतर कोणताही आजार असेल तर एआय डाएट प्लॅन फॉलो करणं धोकादायक ठरू शकतं. अयोग्य डाएटमुळे पौष्टिक कमतरता किंवा हार्मोनल असंतुलन होऊ शकतं.
क्रॅश डाएट आणि मानसिक ताण - वजन लवकर कमी करण्यासाठी एआय खूप कमी कॅलरीज असलेले आहार सुचवू शकतं. यामुळे शारीरिक कमकुवतपणा तर जाणवतोच पण सतत कॅलरीज ट्रॅक करणं आणि मशीनच्या सूचनांचं पालन केल्यानं खाण्याचे विकार किंवा मानसिक ताण देखील येऊ शकतो.
advertisement
डेटाबद्दल प्रश्न: एआय ऑनलाइन उपलब्ध असलेल्या डेटावर आधारित माहिती देतं. वजन कमी करण्याबाबत ऑनलाइन बरीच चुकीची माहिती देखील उपलब्ध आहे. म्हणून, एआयनं दिलेला सल्ला नेहमीच अचूक नसतो हे लक्षात ठेवा. काही टिप्सचा उपयोग करणं आणि पूर्णपणे त्यावर विसंबून राहणं यात मोठा फरक आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी AI चा वापर करताय ? थांबा, ही माहिती आधी पूर्ण वाचा
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement