Muscle soreness : व्यायामानंतरच्या स्नायूदुखीवर कोणते उपाय करायचे ? 'डिलेड ऑनसेट मसल सोरनेस' म्हणजे काय ?
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
व्यायामाच्या वेळेला आणि नंतर होणाऱ्या वेदनांना वैद्यकीय भाषेत, 'डिलेड ऑनसेट मसल सोरनेस' म्हणतात. ही वेदना व्यायामानंतर लगेच होत नाही, तर 12 ते 24 तासांनंतर सुरू होते आणि 48 ते 72 तासांपर्यंत टिकू शकते.
मुंबई : व्यायाम करणाऱ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची. कारण व्यायामात बदल केला की, आपलं शरीर दुखतं. आणि असं दुखणं ही खूप नॉर्मल बाब आहे.
व्यायामाच्या वेळेला आणि नंतर होणाऱ्या वेदनांना वैद्यकीय भाषेत, 'डिलेड ऑनसेट मसल सोरनेस' म्हणतात. ही वेदना व्यायामानंतर लगेच होत नाही, तर 12 ते 24 तासांनंतर सुरू होते आणि 48 ते 72 तासांपर्यंत टिकू शकते. या सगळ्या वेदनांदरम्यान, तुमचं शरीर नवीन श्रमांशी जुळवून घेत असतं याचा हा पुरावा असल्याचं दिल्लीतील आस्था हॉस्पिटलमधील सल्लागार ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. दीपक कुमार यांनी म्हटलं आहे.
advertisement
स्नायू का दुखतात ते समजून घेऊया -
अचानक जड व्यायाम करता तेव्हा स्नायूंच्या तंतूंमधे मायक्रो टियर्स निर्माण होतात. ही गंभीर दुखापत नाही, तर स्नायू विकासित होण्याचा एक नैसर्गिक आणि आवश्यक भाग आहे. जेव्हा हे मायक्रो टियर्स तयार होतात, तेव्हा शरीर त्यांना दुरुस्त करण्यासाठी त्या भागात रक्त प्रवाह वाढवते. या दुरुस्ती प्रक्रियेमुळे थोडी सूज आणि वेदना होतात. हे स्नायू पूर्णपणे बरे होतात तेव्हा ते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतात.
advertisement
लॅक्टिक एसिडबद्दलचे गैरसमज आणि सत्य समजून घेऊया -
बहुतेकांचा विश्वास आहे की व्यायामानंतर वेदना शरीरात लॅक्टिक एसिड जमा झाल्यामुळे होतात, पण डॉक्टर म्हणतात की हे पूर्णपणे चुकीचं आहे. व्यायामादरम्यान लॅक्टिक एसिड तयार होतं, पण ते काही तासांतच बाहेर टाकलं जातं.
वेदना एक किंवा दोन दिवसांनी सुरू होत असल्यानं, खरं कारण लॅक्टिक एसिड नसून स्नायूंमधे होणारी सूक्ष्म झीज आणि सूज हे असतं.
advertisement
काही विशिष्ट परिस्थितीत ही वेदना अधिक जाणवू शकते, जसे की:
अचानक खूप जड वजन उचलणं.
दीर्घ विश्रांतीनंतर व्यायाम पुन्हा सुरू करणं.
पायऱ्या चढणं किंवा उतरणं यासारख्या हालचाली करणं.
व्यायामानंतर थोडं दुखणं स्वाभाविक आहे, पण वेदना असह्य झाल्या, जास्त सूज आली किंवा तुम्हाला शरीराचा तो भाग हलवण्यास त्रास होऊ लागला, तर काळजी घ्या, कारण हे काही अंतर्गत दुखापतीचं लक्षण असू शकतं.
advertisement
वेदना कमी करण्यासाठी काय करायचं ?
व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्म अप करा आणि शेवटी कुल डाऊन होण्याची खात्री करा.
व्यायामानंतर हलकं स्ट्रेचिंग करा.
स्नायूंच्या योग्य रिकव्हरीसाठी भरपूर पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या.
शरीराला भरपूर विश्रांती द्या.
advertisement
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, व्यायामाची तीव्रता किंवा वजन हळूहळू वाढवा जेणेकरून स्नायू श्रमाशी सुरक्षितपणे जुळवून घेऊ शकतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 7:52 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Muscle soreness : व्यायामानंतरच्या स्नायूदुखीवर कोणते उपाय करायचे ? 'डिलेड ऑनसेट मसल सोरनेस' म्हणजे काय ?










