advertisement

Mindful Eating : माईंडफुल इटिंगचा ट्रेंड का चर्चेत ? अन्नाचा आस्वाद घेत जेवणं का महत्त्वाचं ?

Last Updated:

रोजच्या धावपळीत, अन्नाच्या प्रत्येक घासाची चव घेत जेवण कमी होत चाललंय. जेवताना फोन किंवा टेलिव्हिजन सुरु असतोच यामुळे जेवताना अर्ध लक्ष तिकडे असतं. यामुळे आपल्या अन्नाची चव जाणून घेण्याच्या क्षमतेत अडथळा येऊ शकतो आणि आपल्याला पोट भरल्यासारखं वाटत नाही आणि यामुळे अधिक किंवा भूक लागलेली नसताना खाण्याची सवय लागते.

News18
News18
मुंबई : दिवसभरात जेव्हा जेव्हा अन्न खातो तेव्हा ते पूर्ण लक्ष देऊन खा. अन्न आपल्या ताटात येण्यासाठी त्यात कितीजणांचे कष्ट आहेत याची जाणीव ठेवा ही शिकवण लहानपणी दिली जाते. भरभर खाऊ नका, प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खा असं वडिलधारी सांगत आलेत. हीच शिकवण आता mindful eating च्या द्वारे दिली जाते आहे.
रोजच्या धावपळीत, अन्नाच्या प्रत्येक घासाची चव घेत जेवण कमी होत चाललंय. जेवताना फोन किंवा टेलिव्हिजन सुरु असतोच यामुळे जेवताना अर्ध लक्ष तिकडे असतं. यामुळे आपल्या अन्नाची चव जाणून घेण्याच्या क्षमतेत अडथळा येऊ शकतो आणि आपल्याला पोट भरल्यासारखं वाटत नाही आणि यामुळे अधिक किंवा भूक लागलेली नसताना खाण्याची सवय लागते.
जाणीवपूर्वक म्हणजे पूर्ण जाणीव ठेवून, लक्ष देऊन खाण्याची सवय लावली तर फरक पडू शकतो. जाणून घेऊया mindful eating चे फायदे.
advertisement
Mindful eating म्हणजे काय ?
ही सवय म्हणजे जेवताना पूर्णपणे अन्नावर लक्ष केंद्रित करणं. यामुळे आपल्याला भूक आणि पोट भरलंय हे कळू शकतं.
प्रत्येक घास 30-32 वेळा चावा.
जेवणाचा सुगंध, पोत आणि चव यांचा आनंद घ्या.
advertisement
स्क्रिन आणि आवाजापासून दूर शांत ठिकाणी बसून खा.
Mindful eatingचे फायदे -
पचन सुधारतं: खूप लवकर किंवा पटापट खाल्ल्यानं पचन बिघडतं आणि कालांतराने त्याचे नकारात्मक परिणाम तुमच्या शरीरात दिसतात.
जास्त खाणं टाळा: आपण जेवतो तेव्हा मेंदूला वीस मिनिटांनी पोट भरल्याचा संकेत मिळतो. म्हणून, वेळ घ्या आणि हळूहळू खा.
पोटफुगी : खूप पटापट खाल्ल्यानं जास्त हवा श्वासात जाऊ शकतो, ज्यामुळे गॅस आणि पोटफुगी होऊ शकते. लक्षपूर्वक खाण्यानं ही समस्या टाळता येते.
advertisement
Mindful eating चा सराव -
जेवताना फोन किंवा स्क्रीनपासून दूर रहा. स्वच्छ, नीटनेटक्या जागी जेवा. कोणताही गोंधळ किंवा लक्ष विचलित करणारे पदार्थ नसावेत. इंद्रियांना अन्नाचा सुगंध, रंग आणि पोत लक्षात घेण्यासाठी आणि ते अनुभवण्यासाठी वेळ द्या.
advertisement
भूकेचं मूल्यांकन एक ते दहाच्या प्रमाणात करा आणि नंतर तुम्हाला किती खावं लागेल ते ठरवा.
प्रत्येक घास नीट चावून खा; गिळण्याची घाई करू नका.
जेवणाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी, नेहमी लहान वाट्या किंवा प्लेट्समधे अन्न वाढा. यामुळे जास्त खाणं आणि अन्न वाया घालवणं टाळता येईल.
खाण्यासाठी एक निश्चित वेळ निश्चित करा आणि त्या काळात इतर काहीही करणं टाळा.
advertisement
जाणीवपूर्वक खाण्याचं म्हणजेच mindful eatingचं महत्त्व ओळखून, फ्रान्स, स्पेन आणि इटली सारख्या युरोपीय देशांत दुपारच्या जेवणाचा वेळ नियोजित केला जातो, तर यूकेमधे हे प्रमाण कमी होत चाललंय.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mindful Eating : माईंडफुल इटिंगचा ट्रेंड का चर्चेत ? अन्नाचा आस्वाद घेत जेवणं का महत्त्वाचं ?
Next Article
advertisement
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement