advertisement

BBM 6 : राखी सावंत बसलीये सगळ्यांच्या डोक्यावर! आता येणार दुसरी वाईल्ड कार्ड, कोण आहे रेवा कौरसे?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 मध्ये राखी सावंतनंतर आणखी एका अभिनेत्रीची वाईल्ड कार्ड होणार आहे. कोण आहे ही नवी वाईल्ड कार्ड एन्ट्री?
1/8
बिग बॉस मराठी 6 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीचा धमाका सुरूच आहे. पहिली वाईल्ड कार्ड म्हणून राखी सावंतची एन्ट्री झाली. राखी बिग बॉसच्या घरात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. राखीनंतर आता घरात दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.

2/8
बिग बॉस मराठी 6 मध्ये दुसरी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून अभिनेत्री रेवा कौरसेचं नाव समोर येत आहे. त्यामुळे घरातील समीकरणं पुन्हा एकदा बदलणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

3/8
रेवा कौरसे ही हिंदी टेलिव्हिजनवरील ओळखीची अभिनेत्री आहे. ती लवकरच बिग बॉस मराठी 6 मध्ये सहभागी होणार आहे. वाहिनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण रेवाच्या सोशल मीडियावर अशा अनेक स्टोरी शेअर केल्या आहेत ज्यामुळे ती बिग बॉसमध्ये जाणार असल्याचं कळतंय.

4/8
ग्लॅमरस आणि बोल्ड प्रतिमेमुळे रेवा आधीपासूनच चर्चेत असते. विशेष म्हणजे तिने बहुतेक मालिकांमध्ये खलनायिकेच्या भूमिका साकारून वेगळी ओळख निर्माण केली आहे.

5/8
रेवा कौरसे 'दीवानियत' आणि 'प्या का पहला अध्याय: शिव शक्ती' या लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये दिसली होती.  तिच्या अभिनयातील आत्मविश्वास आणि स्क्रीन प्रेझेन्समुळे ती लवकरच प्रेक्षकांच्या पसंतील उतरली आहे. 

6/8
रेवाचा जन्म नागपूरमध्ये झाला. 2021 साली ती 'सीता मनोहर श्री राघवा' या तेलुगू चित्रपटात झळकली होती. या सिनेमातून तिने साउथ इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने हिंदी मालिकांकडे वळत आपला अभिनय प्रवास पुढे चालू ठेवला.

7/8
हिंदी टेलिव्हिजनवर खलनायिकेच्या भूमिकांमुळे ओळख निर्माण केलेली रेवा आता 'बिग बॉस'च्या घरात कसा गेम खेळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

8/8
पहिल्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर घरातील वातावरणात मोठे बदल झाले होते. आता रेवा कौरसेची एन्ट्री झाल्यास खेळात नवे वळण येण्याची शक्यता आहे. ती खलनायिकेची इमेज कायम ठेवणार की आपली वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर मांडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement