advertisement

Rinku Singh Father : वडिलांचे शेवटचे शब्द - 'तुझ्यासारखा मुलगा प्रत्येक बापाला मिळो, जा तू मॅच खेळ, मी हॉस्पिटलमधून प्रार्थना करतो'

Last Updated:

Rinku Singh Father last Word : तुझ्यासारखा मुलगा प्रत्येक बापाला मिळो, जा तू मॅच खेळ, मी हॉस्पिटलमधून प्रार्थना करतो, असं म्हणत रिंकु सिंगच्या वडिलांनी त्याला आशीर्वाद दिले

Rinku Singh Father last emotional Massege
Rinku Singh Father last emotional Massege
Father Last Massege to Rinku Singh : वडिलांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आल्याची बातमी रिंकु सिंगपर्यंत पोहोचली अन् टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये हालचाली सुरू झाल्या. 24 फेब्रुवारीला रिंकु सिंग चेन्नईवरून फ्लाईट पकडून थेट हॉस्पिटलला गेला. त्यादिवशी तो टीम इंडियाचं प्रॅक्टिस सेशन सोडून आला होता. त्यानंतर तो तब्बल 6 तास हॉस्पिटलमध्ये आपल्या वडिलांजवळ थांबला. डॉक्टरांकडे तब्येतीची विचारपूस केली. हॉस्पिटलमध्ये सर्व नातेवाईक जमले होते.

वडिलांसोबतची शेवटची भेट

काळजी घेणारे खूपजण तिथंच होते. काही वेळानंतर रिंकु वडिलांजवळ गेला अन् त्यांना सांगितलं की, मला माघारी जावं लागेल. 26 तारखेला मॅच आहे, तुम्ही काळजी घ्या. त्यावेळी रिंकुही माहिती नव्हतं की, ही आपल्या वडिलांसोबतची शेवटची भेट असेल. रिंकुला पाहिल्यावर त्याच्या वडिलांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला अन् आशीर्वाद दिला.
advertisement

स्वत:ला कधी एकटं समजू नको

असंच खेळत रहा... एक दिवस तू संपूर्ण आभाळ व्यापून टाकशील. स्वत:ला कधी एकटं समजू नको. तुझ्यासारखा मुलगा प्रत्येक बापाला मिळो, जा तू मॅच खेळ, मी हॉस्पिटलमधून प्रार्थना करतो, असं म्हणत रिंकु सिंगच्या वडिलांनी त्याला आशीर्वाद दिले अन् रिंकुने चेन्नईच्या दिशेने कुच केली. वडिलांची अखेरची भेट घेऊन रिंकु निघाला अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी वाईट बातमी कानावर आली.
advertisement

चौथ्या स्टेजचा लिव्हर कॅन्सर

दरम्यान, रिंकु सिंगच्या वडिलांना चौथ्या स्टेजचा लिव्हर कॅन्सर होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. लेकाचं यश पाहून त्यांना आनंद होत असे. आयपीएलमध्ये जेव्हा रिंकुचं सिलेक्शन झालं, त्यावेळी त्यांना आनंद गगनात मावेना झाला होता. अशातच रिंकुच्या कानात अजूनही वडिलांचे शेवटचे शब्द आठवत असतील. आता रिंकु टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये परतणार आहे. वडिलांसाठी तो नक्कीच टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देईल, याच शंका नाही.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rinku Singh Father : वडिलांचे शेवटचे शब्द - 'तुझ्यासारखा मुलगा प्रत्येक बापाला मिळो, जा तू मॅच खेळ, मी हॉस्पिटलमधून प्रार्थना करतो'
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement