advertisement

भिवंडीत आगीचं तांडव! तीन मजली इमारत जळून खाक; उरला फक्त सांगाडा, आगीची भीषणता दाखवणारे PHOTO

Last Updated:
भिवंडीच्या खोखा कंपाउंडमधील निलेश डायिंग कंपनीला भीषण आग लागून कोट्यवधींचे नुकसान झाले, सुदैवाने जीवितहानी टळली, सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह.
1/8
भिवंडीमध्ये अनेक मोठे कारखाने आहेत, गोडाऊन आहेत, वारंवार भिवंडीमध्ये आगीच्या घटना घडत असतात. भिवंडीतील अत्यंत गजबजलेल्या खोखा कंपाउंड परिसरातील 'निलेश डायिंग' या कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

2/8
मिळालेल्या माहितीनुसार, खोखा कंपाउंडमधील निलेश डायिंग ही कंपनी एका तीन मजली इमारतीत कार्यरत आहे. गुरुवारी अचानक या इमारतीतून धुराचे लोट बाहेर येऊ लागले आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. ही आग इतकी भीषण होती की, तीन मजली इमारतीला आगीने सर्व बाजूंनी वेढले होते.

3/8
आगीची बातमी समजताच परिसरात मोठी गर्दी जमा झाली आणि कामगारांमध्ये एकच पळापळ सुरू झाली. या भीषण आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे.

4/8
 कंपनीतील विद्युत उपकरणांमध्ये बिघाड झाल्याने ठिणगी पडली आणि त्यानंतर तिथे असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने संपूर्ण इमारतीला आपल्या विळख्यात घेतले. सुदैवाने, आग लागली तेव्हा वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

5/8
आगीची माहिती मिळताच भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग तीन मजली इमारतीत असल्याने आणि परिसरात कापड व धाग्याचा साठा मोठ्या प्रमाणावर असल्याने आग विझवताना जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

6/8
अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, उशिरापर्यंत कुलिंगचे काम सुरू होते. निलेश डायिंग ही डायिंग आणि प्रोसेसिंग कंपनी असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर यार्न (धागा), कच्चा माल आणि रसायनांचा साठा होता.

7/8
या भीषण आगीत इमारतीमधील महागड्या डायिंग मशिनरी, कच्चा माल आणि तयार धागा जळून खाक झाला आहे. या आगीत कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीच्या ज्वाळांमुळे इमारतीच्या स्ट्रक्चरलाही धोका निर्माण झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

8/8
भिवंडीतील खोखा कंपाउंड आणि वंजारपट्टी नाका परिसरात अशा अनेक कंपन्या दाटीवाटीने वसलेल्या आहेत. अनेक कंपन्यांमध्ये फायर ऑडिट झाले आहे का? सुरक्षेची पुरेशी साधने उपलब्ध आहेत का? असे प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत.

4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement