advertisement

National Science Day: आकाशात अद्भुत खगोलीय नजारा! सूर्यास्तानंतर 6 ग्रह एका रेषेत दिसणार, कसं पाहायचं? Video

Last Updated:

National Science Day: सूर्यास्तानंतर सौरमंडळातील सहा महत्त्वाचे ग्रह एका रेषेत दिसणार आहेत, ज्याला प्लॅनेट परेड असे म्हणतात.

+
National

National Science Day: आकाशात अद्भुत खगोलीय नजारा! सूर्यास्तानंतर 6 ग्रह एका रेषेत दिसणार, कसं पाहायचं? Video

पुणे: आज, 28 फेब्रुवारी रोजी देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जात आहे. याच दिवशी एक दुर्मिळ खगोलीय नजारा पाहायला मिळणार आहे. सूर्यास्तानंतर सौरमंडळातील सहा महत्त्वाचे ग्रह एका रेषेत दिसणार आहेत, ज्याला प्लॅनेट परेड असे म्हणतात. खगोलप्रेमींसाठी ही एक खास सुवर्ण संधी असणार आहे. कमी प्रदूषण असलेल्या ठिकाणी ग्रहांची रांग स्पष्ट दिसू शकते. या घटनेबाबत अधिक माहिती पुणेकर आरुष जोशी यांनी दिली असून त्याने नुकताच दोन लघुग्रहांचा शोध लावला आहे.
आरुष यांनी सांगितले की, सूर्य मावळल्यानंतर साधारण 30 ते 60 मिनिटांनी हा दुर्मिळ नजारा स्पष्ट दिसायला लागेल. यामध्ये सलग सहा ग्रह दिसणार आहेत. या प्लॅनेट परेडमध्ये बुध (Mercury), गुरू (Jupiter), युरेनस (Uranus), शनी (Saturn), शुक्र (Venus) आणि नेपच्यून (Neptune) हे ग्रह सहभागी आहेत. संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांपासून रात्री आठ वाजेपर्यंत तुम्ही हे दृश्य पाहू शकता. यासाठी तुम्ही पश्चिमेकडे, सूर्य मावळताना क्षितिजाकडे पाहावे लागणार आहे.
advertisement
सूर्य मावळल्यानंतर तुम्ही आकाशात सहा ग्रहांची रांग पाहू शकता. यामध्ये जुपिटर (Jupiter) आणि शनी (Saturn) हे मोठे आणि प्रकाशमान ग्रह असल्यामुळे ते डोळ्याने पाहू शकता. बुध (Mercury) आणि शुक्र (Venus) देखील डोळ्याने दिसतात, पण बुध पाहण्यासाठी तुम्हाला अशा ठिकाणी जावे लागेल जिथे प्रदूषण कमी आहे. युरेनस (Uranus) आणि नेपच्यून (Neptune) हे दूरचे ग्रह आहेत, त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी तुम्हाला दुर्बिणीचा वापर करावा लागेल.
advertisement
हे दृश्य कसं ओळखायचं?
पश्चिम दिशेला पाहिलं तर सर्वात आधी तुम्हाला शुक्र (Venus) आणि बुध (Mercury) दिसतील. त्यांच्यापासून थोडं वर शनी (Saturn) आणि नेपच्यून (Neptune) दिसतील, तर त्यांच्याही वर युरेनस (Uranus) पाहता येईल. या संपूर्ण रांगेत गुरू (Jupiter) सर्वात प्रकाशमान दिसेल. जी लोक हे दृश्य पहिल्यांदा बघत आहेत, त्यांना ग्रह ओळखण्यासाठी आरुषने Stellarium Mobile Star App किंवा SkyView Lite अॅप वापरण्याचा सल्ला दिला आहे. या अॅप्समुळे तुम्हाला आकाशातील ग्रह कुठे आहेत हे समजेल आणि ग्रह ओळखण्यास मदत होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
National Science Day: आकाशात अद्भुत खगोलीय नजारा! सूर्यास्तानंतर 6 ग्रह एका रेषेत दिसणार, कसं पाहायचं? Video
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement