advertisement

ENG vs NZ : इंग्लंडच्या संघात पाकचा 'सिक्रेट एजन्ट', न्यूझीलंडच्या तोंडातून विजय खेचणारा रेहमान अहमद कोण? पाकिस्तानशी कनेक्शन काय?

Last Updated:

Rehan ahmed pakistan connection : इंग्लंड क्रिकेटसाठी पाकिस्तान वंशाचा रेहमान अहमद न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हिरो ठरला. 271 च्या स्ट्राईक रेटने रेहमानने बॅटिंग केली अन् पाकिस्तानसाठी सेमीफायनलचा रस्ता क्लियर केला.

Rehan ahmed pakistan connection
Rehan ahmed pakistan connection
England vs New Zealand : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुपर 8 चा सामना खेळवला गेला होता. या सामन्यात इंग्लंडने दणक्यात विजय मिळवला असून सामना अखेरच्या ओव्हरपर्यंत गेला. 16 व्या ओव्हरपर्यंत मॅच न्यूझीलंड आरामात जिंकेल असं वाटत होतं पण तिथंच आता ट्विस्ट... इंग्लंडसाठी डेब्यू करणाऱ्या रेहान अहमद याने 18 व्या ओव्हरमध्ये मॅच फिरवली अन् न्यूझीलंडच्या हातातून विजय निसटला.

271 च्या स्ट्राईक रेटने धुतलं

मॅच जिंकण्यासाठी कॅप्टन मिचेल सँटनर याने ग्लेन फिलिप्स याच्याकडे बॉल सोपवला. 18 वी ओव्हर काढली म्हणजे मॅच हातात येईल, असं त्याला वाटलं असावं पण इंग्लंडने काऊंटर अटॅक केला. इंग्लंडचा 21 वर्षाचा डेब्यू करणाऱ्या रेहान अहमद याने आक्रमक खेळ दाखवत 271 च्या स्ट्राईक रेटने 7 बॉलमध्ये 19 धावांची खेळी केली अन् अवघड असा विजय सोपा करून दिला. विल जॅक्ससह त्याने 19 बॉलमध्ये 44 धावांची पार्टनरशीप केली.
advertisement
स्वत: मिचेल सँटनर याच्याकडे देखील रेहानविरुद्ध काही पर्याय नव्हता. विल जॅक्स आणि रेहान अहमद यांनी न्यूझीलंडचा अखेरच्या 13 मिनिटात गेम केला. त्यामुळे आता पाकिस्तानसाठी सेमीफायनलमध्ये पोहोचायचं असेल तर मोठी संधी आहे. पण न्यूझीलंडला धक्का देणारा हा रेहान अहमद आहे तरी कोण? रेहान अहमदचं पाकिस्तानशी कनेक्शन काय आहे? असा सवाल विचारला जाऊ लागलाय. तर रेहान अहमद हा पाकिस्तानी वंशाचा आहे.
advertisement

रेहान अहमद कोण आहे?

रेहान अहमदच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याचा पाकिस्तानशी खूप जवळचा संबंध आहे. तो मूळचा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश नागरिक असून त्याच्या कुटुंबाची मुळे पाकिस्तानात खोलवर रुजलेली आहेत. रेहानचे वडील, नईम अहमद, हे स्वतः क्रिकेटचे मोठे चाहते होते. ते पाकिस्तानमधील मीरपुरचा रहिवासी असून तिथे ते क्लब क्रिकेटमध्ये एक फास्टर बॉलर आणि ऑलराउंडर म्हणून खेळायचे.
advertisement

पाकिस्तानला दिलं गिफ्ट

दरम्यान, आपल्या कुटुंबाला उत्तम सोयीसुविधा आणि चांगलं जीवन मिळावं या जिद्दीने नईम 2001 मध्ये इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी सुरुवातीच्या काळात टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करून आपल्या मुलाच्या स्वप्नांना बळ दिलं. आपल्या मुलाला त्यानी क्रिकेटसाठी मेहनत घेताना पाहिलंय. आता तोच मुलगा इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात खेळतोय अन् त्याने पाकिस्तानसाठी सेमीफायनलच्या आशा देखील जिवंत केल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ENG vs NZ : इंग्लंडच्या संघात पाकचा 'सिक्रेट एजन्ट', न्यूझीलंडच्या तोंडातून विजय खेचणारा रेहमान अहमद कोण? पाकिस्तानशी कनेक्शन काय?
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement