advertisement

बाबो, किती हे सोनं! रश्मिका-विजयच्या दागिन्यांची चर्चा; बनवणाऱ्या ज्वेलर्सने उलगडलं सगळं 'सीक्रेट'

Last Updated:
रश्मिका आणि विजयने लग्नात घातलेल्या दागिन्यांकडे सगळ्यांंचं लक्ष वेधलं गेलं. या कपलने किलोने टेम्पल गोल्ड ज्वेलरी घालून मॅक्सिमलिज्मला एक नवी ओळख दिली.
1/7
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय यांच्या लग्नाचे फोटो समोर आले तेव्हा त्यांच्या लूकसह त्यांच्या दागिन्यांकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. सोन्याची किंमत इतकी वाढली असताना रश्मिका आणि विजयच्या अंगावरील ही दागिने पाहून सगळ्यांचे डोळे चमकले आहेत. आता हे दागिने बनवणाऱ्या ज्वेलर्सने या दागिन्यांचं सगळं सीक्रेट उलगडलं आहे.

2/7
विजय देवरकोंडाने कानात मोठ्या नाण्यांच्या आकाराच्या स्टड, मनगटावर रुंद कफ, एक लांब आणि एक लहान असे दोन नेकलेस, बाजूबंद, अंगठी, कमरपट्टा, पायात कडा असे दागिने घातले होते. ज्वेर्सने सांगितलं,
विजय देवरकोंडाने कानात मोठ्या नाण्यांच्या आकाराच्या स्टड, मनगटावर रुंद कफ, एक लांब आणि एक लहान असे दोन नेकलेस, बाजूबंद, अंगठी, कमरपट्टा, पायात कडा असे दागिने घातले होते. ज्वेर्सने सांगितलं, "विजयच्या दागिन्यांमध्ये हत्ती म्हणजे बुद्धिमत्तेचं प्रतीक आणि वाघाशी संबंधित डिटेलिंग म्हणजे चपळतेचे प्रतीक होतं. पारंपारिक जडण कलेपासून तयार केलेलं फुलांचे डिझाइन, कोरीव नक्षीकाम आणि रवा डेटिलिंग यामुळे दागिन्यांना कारागिरीचा एक अद्वितीय आयाम मिळाला"
advertisement
3/7
पुरुषांच्या अंगावर दागिने, भारतीय लग्नांमध्ये हे तुलनेने दुर्मिळ होत चाललं आहे. पुरुषांचा दागिन्यांचा वापर कमी होत असताना विजयचा लूकने वराच्या स्टायलिंगला एक मजबूत ओळख दिली आहे. वराच्या मिनिमल स्टाइलिंगपेक्षा वेगळा एक आत्मविश्वासपूर्ण असा हा बदल आहे, जो दागिन्यांना ताकद आणि सुरेखतेचे प्रतीक म्हणून स्वीकारतो, असं ज्वेलर्सनी सांगितलं. 

4/7
रश्मिकाने लग्नात एकूण 11 दागिने घातले होते. यात चोकरसह पारंपारिक हारम, स्टेटमेंट इअररिंग्ज, बाजूबंद, कमरबंद, नथ, बांगड्या, हेअर ज्वेलरी, चंपासरलू, हातफूल, माथापट्टी आणि पैंजण यांचा समावेश होता. ज्वेलर्सनी सांगितलं की
रश्मिकाने लग्नात एकूण 11 दागिने घातले होते. यात चोकरसह पारंपारिक हारम, स्टेटमेंट इअररिंग्ज, बाजूबंद, कमरबंद, नथ, बांगड्या, हेअर ज्वेलरी, चंपासरलू, हातफूल, माथापट्टी आणि पैंजण यांचा समावेश होता. ज्वेलर्सनी सांगितलं की "यात हाय रिलीफ नक्षीकाम आणि बारीक रवा ग्रॅन्युलेशन होतं. प्रत्येक डिटेल कुशल कारागिरांनी आपल्या हातांनी केली आहे. अँटीक मॅट पॉलिशने पूर्ण केलेले, या दागिन्यांच्या तुकड्यांमध्ये एक वारसा होता. जे तिच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळण्यासाठी डिझाइन केलं होतं. 
advertisement
5/7
रश्मिकाचा वधूचा लूक एका जिवंत देवीवर आधारित होता, तर विजयचा लूक एका सम्राटाचं प्रतिबिंब होता
रश्मिकाचा वधूचा लूक एका जिवंत देवीवर आधारित होता, तर विजयचा लूक एका सम्राटाचं प्रतिबिंब होता" असे ब्रँडने एका मुलाखतीत म्हटलं आहे.
advertisement
6/7
रश्मिका आणि विजय यांचे दागिने घडवणं म्हणजे त्याचा उद्देश फक्त सजवणं नव्हता. तर पिढ्या न पिढ्या टिकून राहणारा वारसा निर्माण करायचा होता, असं ते म्हणाले. तसंच आम्हाला दक्षिण भारतीय वास्तुकलेच्या भव्यतेपासून प्रेरणा मिळाली.

7/7
संकल्पनेपासून ते चाचण्या आणि अंतिम स्वरूपापर्यंत संपूर्ण डिझाइन आणि कस्टमायझेशन प्रक्रियेला सुमारे 10 महिने लागले असंही ज्वेलर्सने सांगितलं.
संकल्पनेपासून ते चाचण्या आणि अंतिम स्वरूपापर्यंत संपूर्ण डिझाइन आणि कस्टमायझेशन प्रक्रियेला सुमारे 10 महिने लागले असंही ज्वेलर्सने सांगितलं.
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement