advertisement

ती हातानं दूर ढकलत होती, पण ते दोघं पुन्हा पुन्हा जवळ यायचे अन्...परदेशी महिलेला मुंबईत आला धक्कादायक अनुभव, व्हिडिओच केला शेअर

Last Updated:

मुंबईत असताना दोन तरुणांनी तिचा पाठलाग सुरू केला. महिलेने वारंवार 'नाही' (No) म्हणून विरोध दर्शवला असतानाही, हे तरुण सतत फोटो काढण्याचा आग्रह धरत तिच्या अंगावर येत होते

 महिलेला मुंबईत आला धक्कादायक अनुभव
महिलेला मुंबईत आला धक्कादायक अनुभव
मुंबई : सुरक्षित शहर मानल्या जाणाऱ्या मुंबईत एका परदेशी महिला पर्यटकाचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सेल्फी काढण्याच्या बहाण्याने दोन तरुणांनी या महिलेचा थरारक पाठलाग करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या छळाचा व्हिडिओ संबंधित महिलेने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने दखल घेत गुन्ह्याची नोंद केली आहे.
काय आहे नेमकी घटना?
संबंधित परदेशी महिला गेल्या दोन महिन्यांपासून भारत पर्यटनावर आहे. मुंबईत असताना दोन तरुणांनी तिचा पाठलाग सुरू केला. महिलेने वारंवार 'नाही' (No) म्हणून विरोध दर्शवला असतानाही, हे तरुण सतत फोटो काढण्याचा आग्रह धरत तिच्या अंगावर येत होते. तब्बल १५ मिनिटे हे तरुण तिच्या मागे होते. ही परिस्थिती अत्यंत अस्वस्थ करणारी आणि भीतीदायक असल्याचे पीडित महिलेने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अखेर स्वसंरक्षणासाठी तिला त्या तरुणांना जोरात दूर ढकलावे लागले.
advertisement
advertisement
पोलिसांची तत्परता
हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच मुंबई पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात नराधमांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
भारतातील पहिलाच वाईट अनुभव
"दोन महिन्यांपासून मी भारतात प्रवास करत आहे, पण असा वाईट अनुभव मला पहिल्यांदाच आला," अशा शब्दांत पीडित महिलेने आपली व्यथा मांडली आहे. या घटनेमुळे महिला पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
ती हातानं दूर ढकलत होती, पण ते दोघं पुन्हा पुन्हा जवळ यायचे अन्...परदेशी महिलेला मुंबईत आला धक्कादायक अनुभव, व्हिडिओच केला शेअर
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement