advertisement

मित्र पत्नीला करायचा मेसेज, पतीनं दोघांच्या मदतीने रचला भयंकर कट, पुढे जे घडलं त्यानं सोलापूर हादरलं!

Last Updated:

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे जिल्हा हादरून गेला होता.

News18
News18
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे जिल्हा हादरून गेला होता. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अवघ्या ५ तासांच्या आत मुख्य आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. पत्नीला मेसेज केल्याच्या रागातून पतीने आपल्या मित्रांसह हा खळबळजनक हल्ला केला होता.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कुसळंब येथील बाळासाहेब उकिरडे यांनी आरोपीच्या पत्नीला मेसेज केला होता. याच रागातून पती योगेश मोरे याने आपल्या दोन साथीदारांसह उकिरडे यांना गाठले. आरोपींनी प्रथम लोखंडी रॉडने उकिरडे यांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्यांच्यावर पिस्तूलमधून गोळीबार केला. भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती.
advertisement

पोलिसांचा 'फिल्मी' स्टाईल पाठलाग

घटनेनंतर आरोपी आपली कार घेऊन कर्जतच्या दिशेने फरार झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून बार्शी तालुका ग्रामीण पोलिसांनी तातडीने पथके तैनात केली. आरोपी कर्जतच्या दिशेने जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. ८ ते १० किलोमीटर पाठलाग करून अटक करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या ५ तासांत तिन्ही संशयितांना ताब्यात घेतलं.
advertisement
योगेश मोरे (मुख्य आरोपी), राहुल गायकवाड आणि रोशन पिसाळ असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले साहित्य आणि शस्त्रे जप्त केली आहेत. यामध्ये एका पिस्तूलासह जिवंत काडतूसं, दोन लोखंडी गज, एक कोयता आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. तिन्ही आरोपींना बार्शी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मित्र पत्नीला करायचा मेसेज, पतीनं दोघांच्या मदतीने रचला भयंकर कट, पुढे जे घडलं त्यानं सोलापूर हादरलं!
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement