Mumbai News: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 1 मार्चपासून ‘बेस्ट’ बस रूट बदलणार; जाणून घ्या नवे थांबे
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai News: मुंबईत ज्या भागांमध्ये प्रवाशांची मागणी जास्त आहे त्या ठिकाणी सेवा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेस्ट बसच्या नव्या मार्गांबाबत जाणून घेऊ.
मुंबई: दक्षिण आणि उपनगर भागांमध्ये ‘बेस्ट’च्या बससेवेत मोठे बदल करण्यात आले आहेत. ज्या बसथांब्यांवर प्रवासी संख्या कमी आहे तेथील थांबे कमी करून, ज्या भागांमध्ये प्रवाशांची मागणी जास्त आहे त्या ठिकाणी सेवा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच काही मार्गांवर वातानुकूलित (एसी) बससेवाही सुरू करण्यात येणार आहे. हे सर्व बदल 1 मार्चपासून लागू होणार असून, अनेक प्रवाशांच्या रोजच्या प्रवासावर याचा परिणाम होणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.
मार्गांमध्ये करण्यात आलेले प्रमुख बदल
‘ए 6’ बसमार्ग आता बॅकबे आगाराऐवजी कुलाबा आगारापर्यंत धावणार आहे.
‘ए 22’ मार्ग विजय वल्लभचौकऐवजी जिजामाता उद्यान ते मजास आगारादरम्यान चालवला जाईल.
मार्ग 69 वडाळा आगाराऐवजी शिवडीतील प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथे समाप्त होईल.
‘ए 515’ ही सेवा सिप्झ गावाऐवजी सिप्झ बस स्थानकापर्यंत मर्यादित राहील.
advertisement
‘ए 1’ मार्गातील महत्त्वाचा बदल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सांताक्रुझ डेपो दरम्यान धावणाऱ्या ‘ए 1’ बसमार्गातही बदल करण्यात आला आहे. वांद्रे रिक्लेमेशन आणि वांद्रे पश्चिम बस स्थानकावरील वळसा रद्द करून ही बस आता माहीम कोळीवाडा ते वांद्रे टॉकीजदरम्यान स्वामी विवेकानंद रोडमार्गे थेट धावेल. त्यामुळे प्रवास अधिक जलद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
‘ए 101’ मार्गाचा विस्तार
सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वर्ल्ड ट्रेड सेंटरदरम्यान धावणारा ‘ए 101’ मार्ग आता महात्मा फुले मंडईपर्यंत वाढवण्यात आला आहे. परतीचा प्रवास डॉ. डी. एन. रोड आणि हुतात्मा चौकमार्गे होईल. या विस्तारामुळे दक्षिण मुंबईतील प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत.
काही मार्गांवर वातानुकूलित सेवा
खालील बसमार्गांवर एसी बससेवा सुरू करण्यात येणार आहे:
advertisement
ए-203 : आरसी चर्च – कमला नेहरू उद्यान
ए-324 : शास्त्री नगर – चांदिवली बस स्थानक (प)
ए-326 : अंधेरी स्थानक (प) – मिल्लतनगर
ए-346 : अंधेरी स्थानक (प) – रमेश नगर
ए-354 : अंधेरी स्थानक (प) – वीरा देसाई मार्ग (विस्तारित)
ए-381 : माहुल गाव – कुलाबा बस स्थानक (पु.)
advertisement
ए-412 : माजगाव आगार – मुंब्रा फाटा (ठाणे)
‘बेस्ट’ने कोणताही मार्ग पूर्णपणे बंद केलेला नाही. ज्या ठिकाणी प्रवासी कमी आहेत तेथे बस कमी करून, ज्या मार्गांवर जास्त गर्दी आहे तेथे बसची वारंवारता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगली आणि जलद सेवा मिळेल, असा प्रशासनाचा दावा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 9:24 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 1 मार्चपासून ‘बेस्ट’ बस रूट बदलणार; जाणून घ्या नवे थांबे







