Viral Video: शिक्षणाला काही वय नसतं! लेकीचं लग्न अन् दुसरीकडं दहावीचा पेपर; काकींच्या पेपरची जोरदार चर्चा
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
सध्या इन्स्टाग्रामवर एका काकींचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. लेकीच्या लग्नाची तयारी करत असताना त्या काकी दहावीच्या परिक्षेची तयारी करत आहेत. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.
असं म्हणतात, शिक्षणाला काही वय नसतं. आपण अनेकदा दहावी किंवा बारावीच्या परिक्षेला आजींना, आजोबांना, काकांना किंवा काकींनाही बसलेलं पाहतो. कल्याणमध्येही अशाच एक काकी सध्या चर्चेत आल्या आहेत. एका बाजूला त्यांची दहावीची परीक्षा आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या लेकीच्या लग्नाची तयारी सुरू आहे. लेकीच्या लग्नाची तयारी करत असताना त्या काकी दहावीच्या परिक्षेची तयारी करत आहेत. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. त्या काकींचे सध्या इन्स्टा युजर्सकडून जोरदार कौतुक होत आहे.
मी बंटी भाऊ नावाच्या एका युजरने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या युजरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या घरातले सर्व सदस्य मुलीच्या लग्नाची तयारी करताना दिसत आहे. लग्नाच्या पत्रिका तयार करत असल्याची लगबग पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे त्या काकी दहावीच्या पेपरची तयारी करताना दिसत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्या काकींचा मुलगा त्यांना बोलतो की, "इथे आम्ही सगळे लग्न पत्रिका कव्हरमध्ये भरतोय, आमच्या ताईचं लग्न आहे आणि माझी तिकडे काही तरी काम करतेय. मम्मी तू तिकडे काय करतेय?" त्या काकी म्हणतात, "मी इंग्लिशचा अभ्यास करतेय, मी यावर्षी दहावीला आहे."
advertisement
advertisement
त्या काकींना त्यांची मुलं म्हणतायत की, "इथे मुलीच्या लग्नाची गडबड चालू असताना पण तुझं काय चाललंय? " माझं गेल्या अनेक वर्षांपासून दहावीला बसण्याचा प्लॅन सुरू होता, पण शेवटी यावर्षी मी बसलेच. अचानक माझ्या मुलीचं लग्न ठरल्यामुळे आता ही सर्व गडबड झालीये, असं काकी म्हणतायत. दरम्यान काकींचे सर्वच इन्स्टा युजर्सकडून कौतुक होत आहे. या वयातही काकींना अभ्यासाची गोडी आहे, असं म्हणत अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. "लग्नाचे पेढे आणि दहावीचे पेढे एकत्रच आता", "मम्मी शिकली प्रगती झाली", "मावशींचा स्वॅगच वेगळा आहे, ऑल द बेस्ट मावशी", "खूप छान.... शिक्षणाला वय नसते... All The Best..... शिक्षण आपल्याला कधी कसं उपयोगी पडेल ते सांगता येत नाही...." असं म्हणत अनेक युजर्सने काकींचं कौतुक केलं जात आहे.
advertisement
दरम्यान, इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर त्यांच्या मुलाने आणखी एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. काकींचा मुलगा त्यांना विचारतोय की, पेपर कसा गेला? त्यावर काकी म्हणाल्या, "एकदम छान पेपर गेला, खूप सोप्पा पेपर गेला." सध्या काकींकडून दहावीच्या पेपरची जोरदार तयारी सुरू असून आपल्या परीने त्या खूप उत्तम पद्धतीने पेपर सोडवताना दिसत आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ कल्याण पूर्वेतील आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 9:00 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Viral Video: शिक्षणाला काही वय नसतं! लेकीचं लग्न अन् दुसरीकडं दहावीचा पेपर; काकींच्या पेपरची जोरदार चर्चा









