advertisement

डोकं, हात, पाय आणि पाठ, एकही जागा सोडली नाही, चिमुरड्याच्या अंगाची कुत्र्यांनी केली चाळण,छ. संभाजीनगरमधील घटना

Last Updated:

छत्रपती संभाजीनगरमधील नारेगावमध्ये ही घटना घडली आहे. भटक्या कुत्र्यांनी एका ४ वर्षांच्या मुलावर अचानक हल्ला केला.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : राज्याभरात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर कुत्र्यांनी चावल्यामुळे रेबिजची लक्षण जाणवू लागल्यामुळे एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भटक्या कुत्र्यांनी एका चिमुरड्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्यांनी चिमुरड्याच्या संपूर्ण अंगभर चावा घेतला. चिमुरडीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील नारेगावमध्ये ही घटना घडली आहे. भटक्या कुत्र्यांनी एका ४ वर्षांच्या मुलावर अचानक हल्ला केला. हाा मुलगा घराजवळ खेळत होती. त्यावेळी भटक्या कुत्र्यांनी या चिमुरड्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी अक्षरशः मुलीचे लचके तोडले.  या मुलीच्या शरीरावर सगळीकडे कुत्र्यांनी चावा घेतला. हात, पाय, पाठ आणि डोक्यावर सुद्धा कुत्र्याने चावा घेतला.
advertisement
या हल्ल्यात चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. भटक्या कुत्र्याने या मुलाच्या पाठीवर असंख्य चावे घेतले आहे. हे दृश्य पाहून डॉक्टर सुद्धा हळहळले.  मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या मुलाच्या नातेवाईकांनी भटक्या कुत्र्यांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
advertisement
आठवड्यातली दुसरी घटना
छत्रपती संभाजीनगर शहरात कुत्र्यांचा अक्षरशः हैदोस सुरू आहे.  आठवडाभरापूर्वीच राजा बाहेर खेळणाऱ्या बायजीपुरा भागात कुत्र्याने सामूहिक हल्ला केला होता. त्याही वेळेस बालक जखमी झाला होता. शहरात सगळीकडे कुत्र्यांच्या टोळ्याच्या टोळ्या फिरत आहेत, मात्र महानगरपालिका कोणतीही कारवाई करत नाही. कुत्रे पकडण्याच्या नावाखाली लाखो रुपये कमावले जातात आणि त्यात आता लहान मुलांचा जीव जातोय. नगरपालिकेकडे नारेगाव परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यानंतर चार कुत्रे पकडले असल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण, कुत्र्याचे हल्ले काही केले कमी झाले नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डोकं, हात, पाय आणि पाठ, एकही जागा सोडली नाही, चिमुरड्याच्या अंगाची कुत्र्यांनी केली चाळण,छ. संभाजीनगरमधील घटना
Next Article
advertisement
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement