Israel Iran News: रणगाडे, विमानं अन् अण्वस्त्रं... इस्त्रायल आणि इराणमध्ये सर्वात शक्तिशाली कोण? थक्क करणारी आकडेवारी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
इस्त्रायल- अमेरिकेनं इराणवर क्षेपणास्त्र डागले. त्यानंतर इराणनं जोरदार प्रत्युत्तर देत इस्त्रायलसह अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले चढवले.
Israel Iran News: मध्य आशियात युद्धाचा भडका उडाला आहे, अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्ध पेटलंय पण या युद्धाच्या झळा सौदी अरेबिया, दुबई, कतार, बहरीनसह मध्य आशियातील अनेक देशांनाही बसू लागल्यात आहेत. गेल्या काही दिवसांपासून अण्वस्त्रांच्या मुद्द्यावरून इराण आणि अमेरिका इस्रायलमध्ये सुरू असलेला संघर्ष चिघळलाय. आज अखेर युद्धाची ठिणगी पडली आणि संपूर्ण मध्य आशियात भडका उडला आहे. सकाळी इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर साठ ते सत्तरहून अधिक क्षेपणास्त्र डागली. प्रीएम्प्टिव्ह म्हणजेच क्षत्रू राष्ट्र कोणत्याही क्षणी हल्ला करेल या संशयातून पहिला हल्ला केल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामीन नेतान्याहू यांनी सांगितलं
इस्त्रायल- अमेरिकेनं इराणवर क्षेपणास्त्र डागले. त्यानंतर इराणनं जोरदार प्रत्युत्तर देत इस्त्रायलसह अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले चढवले. त्यामुळे जगावर युद्धाचे ढग जमा होऊ लागले आहेत.
इराणवरील हल्ल्यामुळे युद्धाचा भडका
इराणवरील हल्ल्यामुळे युद्धाचा भडका उडाला आहे. एकीकडं इस्त्रायल -अमेरिकेची जोडी तर दुसरीकडं इराण असा हा लष्करी संघर्ष पेटला आहे.चहुबाजूनं शस्त्रू राष्ट्र असतानाही इस्त्रायलनं थेट इराणावर हल्ला चढवलाय. कारण इस्त्रायलला अमेरिकेचं लष्करी पाठबळआहे. त्यामुळेचं इस्त्रायलनं हे धाडस केलं आहे. पण या दोन्ही देशांमध्य़े युद्धाची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांच्यात संघर्ष झाला आहे.कारण दोन्ही देशांकडं मोठी लष्करी ताकद आहे. आजवरच्या युद्धातून ते पाहायला मिळालं आहे.
advertisement
कुणाची किती ताकद?
| लष्करी शक्ती | इस्रायल (Israel) | इराण (Iran) |
| लढाऊ विमानं | 612 | 551 |
| हवाई संरक्षण प्रणाली | आयर्न डोम (Iron Dome) | मेस्बाह 1 (Mesbah 1) |
| क्षेपणास्त्रं | जेरिको 3 (Jericho 3) | 3000 (बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे) |
| युद्धनौका | 67 | 101 |
| सैनिक संख्या | 5,70,000 | 6,10,000 |
| तोफा | 3,450 | 1,000 |
| रणगाडे | 1,370 | 1,996 |
| अण्वस्त्र | जाहीर कबुली नाही (पण अस्तित्व मानले जाते) | निर्मितीचा प्रयत्न सुरू |
advertisement
इस्त्रायल आणि इराण दरम्यान 2100 किलोमीटरचं अंतर आहे. पण आता हे घातक क्षेपणास्त्र अनेक देश ओलांडून लक्षभेद करताहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला जात आहे. लष्करी तळांवर हे हल्ले केले जात आहे.
इस्त्रायलला अमेरिकेचं पाठबळ असल्यामुळे या युद्धात इस्त्रायलचं पारडं जड वाटत असलं तरी इराणही काही मागे हटायला तयार नाही. इराण केवळ इस्त्रायल-आणि अमेरिकेच्या दुहेरी हल्ल्याला तोंड देतंय असं नाही तर या दोन्ही देशांच्या लष्करी तळांवर इराणानं प्रतिहल्ला चढवला आहे. हे युद्ध भविष्यात कोणतं वळण घेतं हे आगामी काळातचं स्पष्ट होईल. दरम्यान मध्य आशियावर युद्धाचे ढग गडद झाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 9:49 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Israel Iran News: रणगाडे, विमानं अन् अण्वस्त्रं... इस्त्रायल आणि इराणमध्ये सर्वात शक्तिशाली कोण? थक्क करणारी आकडेवारी








