advertisement

ग्राहक बनून आले, चोरी करून गेले, ७ कोटींचे दागिने लंपास, पोलिसांनी सापळा रचून आरोपींना जंगलातून उचललं

Last Updated:

Mumbai News: ६ कोटी ७९ लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी मुंबईत उघड झाली. या गुन्ह्यातील ४ आरोपींना राजस्थानमधून अटक करण्यात आली.

मुंबईत सात कोटींच्या दागिन्यांची चोरी
मुंबईत सात कोटींच्या दागिन्यांची चोरी
विजय वंजारा, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत सोन्या-चांदीच्या दागिन्यांची तब्बल ६ कोटी ७९ लाख ८५ हजार रुपयांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी ४ आरोपींना राजस्थानमधून अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१४ जानेवारी २०२६ रोजी एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराच्या गोरेगाव येथील ज्वेलरी दुकानातून १३ ते १४ जानेवारीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. दुकानात ग्राहक बनून आलेल्या आरोपींनी संधी साधून हा हातसफाईचा प्रकार केल्याचे तपासात उघड झाले.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी राजस्थानमध्ये पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथक तातडीने रवाना करण्यात आले. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात जंगल परिसरात लपून बसलेल्या आरोपींना पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
advertisement
अटकेत असलेल्या आरोपींकडून सुमारे ३ किलो वजनाचे सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत ४ कोटी ५० लाख रुपये) तसेच ५ किलो चांदीचे दागिने (अंदाजे किंमत १५ लाख रुपये) असा एकूण ४ कोटी ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून आरोपींच्या इतर गुन्ह्यांबाबतही चौकशी करण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ग्राहक बनून आले, चोरी करून गेले, ७ कोटींचे दागिने लंपास, पोलिसांनी सापळा रचून आरोपींना जंगलातून उचललं
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement