advertisement

मोबाईल दिला नाही, शाळकरी पोरगा टेन्शनमध्ये, सोलापुरातल्या चिमुरड्याने नको ते पाऊल उचललं

Last Updated:

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये पालकांनी मोबाईल वापरण्यास न दिल्यामुळे एका तेरा वर्षीय मुलाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

यशराज डोके (मयत)
यशराज डोके (मयत)
प्रीतम पंडित, प्रतिनिधी, सोलापूर : सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात मोबाईलचा अतिवापर सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात पालकांनी मोबाईल वापरण्यास न दिल्यामुळे एका तेरा वर्षीय मुलाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मोहोळ तालुक्यातील पेनुर येथील यशराज धर्मराज डोके असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात याबाबतीत नोंद करण्यात आली आहे. मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे धर्मराज डोके हे कुटुंब समावेत राहण्यास असून शेती करून उपजीविका करतात.
एक मार्च रोजी सायंकाळी 7 वाजण्यापूर्वी राहत्या घरी यशराज डोके याने मोबाईल वापरण्यास का दिला नाही? म्हणून स्वतःहून राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास लावून घेतला होता.
advertisement

लोखंडी रॉड घालून कडी तोडली तर...

यशराज घराची कडी का उघडत नाही? म्हणून कुटुंबीयांनी लोखंडी रॉड घालून कडी तोडली. त्यावेळी तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला तात्काळ पेनुर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.. त्यानंतर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
advertisement
दरम्यान, याप्रकरणी आबा दत्तात्रय डोके यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात माहिती दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल नाळे करीत आहेत.

पोलीस तक्रारीत काय म्हटले आहे?

यशराज याने मोबाईल पाहण्यास का दिला नाही म्हणून स्वत:हून राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन मयत झाला असून याशिवाय दुसरे काहीही कारण नाही, असे यशराज याच्या काकाने पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोबाईल दिला नाही, शाळकरी पोरगा टेन्शनमध्ये, सोलापुरातल्या चिमुरड्याने नको ते पाऊल उचललं
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement