Nashik Crime: नाशिक हादरलं! ४ वर्षीय मुलासोबत व्यावसायिकाची रेल्वेखाली उडी; कारण ऐकून कुटुंबीय हादरले
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
40 वर्षीय व्यावसायिकाने आपल्या चार वर्षांच्या लेकासोबत आत्महत्या करत जीवन संपवले आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
नाशिक: येवला तालुक्यामध्ये एका व्यावसायिकाने रेल्वे खाली आत्महत्या केली आहे. 40 वर्षीय व्यावसायिकाने आपल्या चार वर्षांच्या लेकासोबत जीवन संपवले आहे. नेमकं व्यावसायिकाने कोणत्या कारणास्तव इतकं मोठं पाऊल उचललं आहे. याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. चांदवड पोलीस स्थानकामध्ये आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
येवला तालुक्यातील धुळगावतल्या 40 वर्षीय वाल्मीक गायकवाड नावाच्या व्यावसायिकाने आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली आहे. व्यावसायिकाने नेमक्या कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली आहे, याचं कारण सध्या तरी गुलदस्त्यात आहे. शनिवारी (28 फेब्रुवारी) संध्याकळच्यावेळी वाल्मीक आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा कारने चांदवड तालुक्यातील समिट तळेगाव येथे आले होते. तेव्हा त्यांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली आहे.
advertisement
तळेगाव रोही इथे कार पार्क करून वाल्मीक आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलाने पुढे जाऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलाच्या पार्थिवावर धुळगावामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान, वाल्मीक गायकवाड यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि दीड महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. नेमकं व्यावसायिक वाल्मीक गायकवाड यांनी का आत्महत्या केली? त्याचं गुपित आता चांदवड पोलिसांकडून शोधलं जात आहे.
advertisement
दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चांदवड पोलिसांकडून शनिवारी चांदवड पोलीस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाय, आकस्मात मृत्यूचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 7:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Crime: नाशिक हादरलं! ४ वर्षीय मुलासोबत व्यावसायिकाची रेल्वेखाली उडी; कारण ऐकून कुटुंबीय हादरले







