advertisement

Beed: जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची प्रथा, जावई पिकात लपून बसला अन्...

Last Updated:
विडा ग्रामपंचायतीकडून जावयाला कपड्यांचा आहेर, तर सासरच्या मंडळींकडून ५ ग्रॅम सोन्याची अंगठी देऊन जावयाचा गौरव केला जातो.
1/5
बीडच्या केज तालुक्यातील विडा येथे प्रत्येक वर्षी धुलीवंदनानिमित्त गावच्या एका जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते.
बीडच्या केज तालुक्यातील विडा येथे प्रत्येक वर्षी धुलीवंदनानिमित्त गावच्या एका जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते.
advertisement
2/5
गेल्या शंभर वर्षांपासून ही प्रथा अखंडितपणे सुरू होती. परंतु गतवर्षी विडा या गावापासून जवळच असलेल्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने ही परंपरा खंडित झाली होती.

3/5
यावर्षी मात्र परंपरेप्रमाणे जावयाची गावातून गाढवावर बसवून मिरवणूक काढली जाणार आहे. त्यासाठी आता जावयाचा शोध देखील सुरू असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. एका जावयाचा पाठलाग केला. मात्र तो ज्वारीच्या पिकात लपून बसलेला होता. लोक येण्याची चाहूल लागताच धूम ठोकून तो पळून गेला.

4/5
परंपरेप्रमाणे जावयाला शोधून धुलिवंदनादिवशी सकाळी त्याची गाढवावर बसून गावभर मिरवणूक काढले जाते. यानंतर मारुती मंदिरावर या जावयाचा सन्मान देखील केला जातो. यामध्ये जावयाला कपड्यांचा आहेर आणि पाच ग्रॅमची अंगठी देखील गावकऱ्यांच्या वतीने दिली जाते.

5/5
एका वेळी एका जावयाला हा मान दिला जातो. यावर्षीचा मान कोणाला मिळतो आणि कोणता जावई विडेकरांच्या हाती लागतो हे औत्सुक्याचे आहे.

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement