advertisement

Holi Dahan 2026: आज होळी पौर्णिमा! होळीची पूजा, दहनाचा शुभ मुहूर्त, मंत्र, विधी, धार्मिक महत्त्व पाहा

Last Updated:

Holi Dahan 2026: होळी दिवशी बोंब मारायला मिळणार म्हणून लहान मुलांमध्ये वेगळाच उत्साह असतो. या दिवशी घरातील स्त्रिया शुभ वेळी होळीची पूजा करून पुरण-पोळीचा नैवेद्य अर्पण करून घराच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. जाणून घेऊया आज होळीची पूजा कशी करायची, शुभ मुहूर्त, मंत्र इत्यादी.

कर्क - या काळात तुमची कल्पनाशक्ती वाढेल आणि तुम्हाला वाचनाची किंवा नवीन काहीतरी शिकण्याची आवड निर्माण होईल. जर तुम्ही मालमत्ता किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ तुमच्यासाठी एकदम लकी आहे. वडील किंवा गुरूंसमान व्यक्तींकडून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन्स बनतील. तुमच्या पार्टनरसोबतचे ट्युनिंग सुधारेल आणि रिलेशनमध्ये गोडवा येईल.लकी नंबर: 2, लकी कलर: पांढरा
कर्क - या काळात तुमची कल्पनाशक्ती वाढेल आणि तुम्हाला वाचनाची किंवा नवीन काहीतरी शिकण्याची आवड निर्माण होईल. जर तुम्ही मालमत्ता किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ तुमच्यासाठी एकदम लकी आहे. वडील किंवा गुरूंसमान व्यक्तींकडून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन्स बनतील. तुमच्या पार्टनरसोबतचे ट्युनिंग सुधारेल आणि रिलेशनमध्ये गोडवा येईल.लकी नंबर: 2, लकी कलर: पांढरा
मुंबई : आज 2 मार्च, सोमवार रोजी होळी पेटवण्याचा सण आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी म्हणजे कोकणी भाषेत शिमगा उत्साहात साजरा करतो. होळी दिवशी बोंब मारायला मिळणार म्हणून लहान मुलांमध्ये वेगळाच उत्साह असतो. या दिवशी घरातील स्त्रिया शुभ वेळी होळीची पूजा करून पुरण-पोळीचा नैवेद्य अर्पण करून घराच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. सोमवार 2 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होत असून या दिवशी प्रदोष काळात पौर्णिमा आहे. तसेच मंगळवार 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. त्यामुळे 'धर्मसिंधू'त सांगितल्याप्रमाणे पूर्वदिवशी म्हणजेच सोमवार 2 मार्च रोजी होळी पेटवावी. सोमवार 2 मार्च रोजी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भद्राकाळातही होलिका दहन करता येते, असे ज्येष्ठ पंचागकर्ते दा.कृ सोमण यांनी सांगितले.
होळी का पेटवली जाते?
होळीची कथा हिरण्यकश्यप आणि त्याचा मुलगा प्रल्हाद यांच्याशी संबधित सांगितली जाते. हिरण्यकश्यप स्वतःला देव मानत असे, पण प्रल्हाद भगवान विष्णूचा मोठा भक्त होता. रागाच्या भरात हिरण्यकश्यपने आपली बहीण होलिका हिच्या मदतीने प्रल्हादाला अग्नीत जाळायचा प्रयत्न केला. होलिकेला अग्नीपासून न जळण्याचं वरदान होतं, पण ती अधर्माच्या बाजूने असल्याने स्वतः जळून खाक झाली आणि भक्त प्रल्हाद सुखरूप राहिला. याच घटनेची आठवण म्हणून आपण होळी पेटवतो.
advertisement
होळी पेटवणे: 2 मार्च, सोमवार
पौर्णिमा तिथीची सुरुवात – 2 मार्च सोमवार, संध्याकाळी 5 वाजून 55 मिनिटांपासून
पौर्णिमा तिथीची समाप्ती – 3 मार्च मंगळवार, संध्याकाळी 5 वाजून 7 मिनिटांपर्यंत
ज्योतिषांनुसार, होळी आज 2 मार्चला पौर्णिमा तिथी सुरू झाल्यानंतर सायंकाळी पेटवावी.
होळी पेटवण्याचा मुहूर्त 2026 -
काही ज्योतिष तज्ज्ञांच्या मते सायंकाळी भद्रकाळ असल्यानं होळी पेटवणं चांगलं मानलं जातं. त्यामुळे होळी पेटवण्याचा शुभ मुहूर्त 2 मार्चच्या मध्यरात्री 12 वाजून 50 मिनिटांनी सुरू होईल आणि 2 वाजून 27 मिनिटांपर्यंत असेल. पण यावेळात होळी साजरी करणं कोणाला शक्य होणार नाही.
advertisement
होळी पूजेचं साहित्य -
वाळलेली लाकडे, गव्हाच्या लोंब्या, गोवऱ्यांची माळ (हार), सुकं गवत, फुले, गुलाल, रंग, मूग, गूळ, धूप, हळद, अक्षता, रोळी, जव, हार, तांब्याभर पाणी, बत्तासे, नारळ, कापूर, मिठाई, कच्चा सूत इत्यादी.
advertisement
धार्मिक महत्त्व - होळी पेटवणं हे केवळ धार्मिक काम नाही, तर आपल्या संस्कृतीचा एक मोठा भाग आहे. श्रद्धेने केलेली पूजा आयुष्यात पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन येते. असं मानलं जातं की होळीच्या अग्नीने आपल्या आयुष्यातील नकारात्मकता जळून खाक होते. सगळ्यांनी मिळून होळी पेटवल्याने समाजात एकोपा आणि प्रेम वाढतं.
होळी पूजेचे मंत्र
ओम होलिकायै नम:
advertisement
ओम प्रह्लादाय नम:
ओम नृसिंहाय नम:
होळी पूजेची पद्धत 2026 - परिसरातील किंवा घराच्या जवळच्या मोकळ्या जागेत लाकडे आणि गोवऱ्या रचून होळी तयार केली जाते. सगळ्यात आधी उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसावं. मनातल्या मनात भगवान नरसिंह आणि भक्त प्रल्हाद यांचं नाव घ्यावं. त्यानंतर होळीच्या जागी थोडं पाणी अर्पण करावं (पाण्यात थोडं दूध आणि तूप मिसळून घ्या). त्यानंतर अक्षता, फुले आणि बाकी पूजेचं साहित्य वाहावं. गव्हाच्या सात लोंब्या आणि गोवऱ्या अर्पण कराव्यात. कच्च्या सुताने होळीला तीन किंवा सात फेऱ्या (प्रदक्षिणा) माराव्यात. या वेळी कुटुंबासाठी सुख-शांती आणि चांगल्या आरोग्याची प्रार्थना करावी. शेवटी घरातील मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावेत.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Holi Dahan 2026: आज होळी पौर्णिमा! होळीची पूजा, दहनाचा शुभ मुहूर्त, मंत्र, विधी, धार्मिक महत्त्व पाहा
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement