advertisement

Success Story : 150 प्रकारांचे बनवतात मसाले, 35 महिलांना दिला रोजगार, गावातील अश्विनी बनल्या यशस्वी उद्योजिका, PHOTOS

Last Updated:
अश्विनी डेहाळे यांनी जिद्द आणि सातत्याच्या जोरावर उभा केलेला मसाल्यांचा व्यवसाय आज महिन्याला तब्बल अडीच लाखांच्या उलाढालीपर्यंत पोहोचला आहे.
1/5
घरच्या स्वयंपाकघरातून सुरू झालेला छोटासा मसाल्यांचा प्रयोग आज अनेक महिलांच्या आयुष्याला आधार देणारा ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक (ता. वैजापूर) येथील अश्विनी डेहाळे यांनी जिद्द आणि सातत्याच्या जोरावर उभा केलेला मसाल्यांचा व्यवसाय आज महिन्याला तब्बल अडीच लाखांच्या उलाढालीपर्यंत पोहोचला आहे.

2/5
सुरुवातीला घरातूनच मसाले तयार करून विक्रीला सुरुवात झाली. ग्राहकांचा विश्वास वाढत गेला आणि कामाचा व्यापही वाढला. 2020 मध्ये वाळुज एमआयडीसी परिसरात अश्वराज मसाले या नावाने उत्पादन सुरू करण्यात आले. आज येथे काळा मसाला, खानदेशी गरम मसाला, मिरची पावडर, विविध चटण्या अशा जवळपास 150 प्रकारांचे मसाले तयार होतात.

3/5
या उद्योगाची खरी ताकद म्हणजे महिलांची साथ. तब्बल 30 ते 35 महिलांना येथे नियमित रोजगार मिळतो. मसाल्यांची निवड, स्वच्छता, भाजणी, दळण आणि पॅकिंगपर्यंत प्रत्येक टप्प्यावर महिलांचाच सहभाग असतो.

4/5
काही यंत्रसामग्रीची मदत घेतली जाते, पण दर्जावर कोणतीही तडजोड केली जात नाही. रसायनांचा वापर टाळून शुद्ध आणि चविष्ट मसाले तयार करण्यावर भर दिला जातो. अश्वराज मसाल्यांची विक्री जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये, स्टॉलद्वारे तसेच ऑनलाइन माध्यमातूनही केली जाते.

5/5
ग्राहकांच्या पसंतीमुळे व्यवसाय सातत्याने वाढत आहे. महिन्याला 2 ते अडीच लाखांची उलाढाल होत असल्याचे अश्विनी डेहाळे सांगतात.

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement