जय पवारांच्या Video ने रोहित सिंगच्या अडचणी वाढल्या, VSR कंपनी संशयाच्या घेऱ्यात, दादांचं नेमकं काय झालं?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
जय पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, पायलट सीटवर बसून चक्क झोपी गेला आहे. विमान हवेत उडत असताना ते चक्क झोपी गेल्याचं पाहायला मिळतं आहे.
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारी 2026 रोजी अपघात झाला. त्यानंतर या अपघाताबाबत अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले. अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषदा घेत हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला. आता अजित पवारांच्या निधनाला एक महिना उलटल्यानंतर त्यांचा मुलगा जय पवार यांनी एक धक्कादायक पोस्ट शेअर केलीय. त्यांच्या पोस्टनं पुन्हा एकदा राज्यात खळबळ उडालीय.
जय पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, पायलट सीटवर बसून चक्क झोपी गेला आहे. विमान हवेत उडत असताना ते चक्क झोपी गेल्याचं पाहायला मिळतं आहे. हा व्हिडिओ अजित पवारांचे पुत्र जय पवारांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडिओ असला तरी हा सगळा प्रकार अत्यंत गंभीर आहे. कारण याच रोहित सिंग यांच्या खासगी विमानाच्या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झालाय. आणि त्यामुळेच या व्हिडिओला महत्वप्राप्त झालं आहे.
advertisement
जय पवार काय म्हणाले?
हा व्हिडिओ शेअर करत जय पवारांनी रोहित सिंगच्या अटकेची मागणी केलीय. माझ्या वडिलांना आपण गमावलं....ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे...या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत..आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही...हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे...मी DGCA ला ठामपणे मागणी करतो...या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी, संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमानं तात्काळ ग्राऊंड करण्यात यावीत आणि रोहिल सिंह यांना त्वरित अटक करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी....ही एका मुलाची आर्त हाक आहे...माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी, असे जय पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
advertisement
advertisement
तपास अहवालावर नाराजी
अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात गेल्याचं आठवड्यात AAIBचा प्राथमिक चौकशी अहवाल जारी करण्यात आला. त्यावरही जय पवार यांनी नाराजी व्यक्त केलीय. AAIB नं दिलेला प्राथमिक अहवाल मी वाचला. हा अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचं पाहून मला खेद वाटत असून वेदना होत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला तसंच या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबीयांना केवळ औपचारिक माहिती नव्हे तर सत्य.. पारदर्शक आणि सर्वंकष उत्तरं मिळालीच पाहिजेत...प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, आवश्यक असल्यास VSR च्या संपूर्ण विमान ताफ्याचे संचलन बंद करण्याचाही DGCA ने विचार करावा, असे जय पवार म्हणाले.
advertisement
रोहित सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
जय पवारांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या नाराजीनं व्हीएसआर कंपनीच्या कारभारावरील संशय अधिक गडद होतोय. याआधीही अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी व्हिएसआर कंपनीवर गंभीर आरोप केले होते. आता या नव्या व्हिडीओमुळे रोहित सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडीओनंतर सरकार कोणती कारवाई करणार?
advertisement
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनी आणि त्यांचा कारभार संशयाच्या घेऱ्यात आहे. अलीकडेच डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावत 5 विमानांच्या उड्डाणांवर बंदी आणली होती. तर रोहित पवार यांनी एफआयआर दाखल करण्यासाठी जोरदार आंदोलन केलं होतं. त्यामुळे आता जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडीओनंतर सरकार कोणती कारवाई करतं यावकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 9:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जय पवारांच्या Video ने रोहित सिंगच्या अडचणी वाढल्या, VSR कंपनी संशयाच्या घेऱ्यात, दादांचं नेमकं काय झालं?








