'खामेनेई कायम आमच्या हृदयात राहतील', BB19 फेम अभिनेत्रीच्या पोस्टवरून राडा; नेटकऱ्यांनी झापझाप झापलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ali Khamenei death: या संवेदनशील मुद्द्यावर आता 'बिग बॉस १९' ची स्पर्धक आणि अभिनेत्रीने दिलेलं एक विधान तिच्या अंगलट आलं असून, सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.
मुंबई: इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या घनघोर युद्धाने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. या संघर्षात इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने जागतिक राजकारणात भूकंप झाला आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ही बातमी आल्यानंतर इराणमध्ये जिथे एकीकडे शोक पाळला जात आहे, तिथेच दुसरीकडे काही गट जल्लोषही करत आहेत. या संवेदनशील मुद्द्यावर आता 'बिग बॉस १९' ची स्पर्धक आणि अभिनेत्री फरहाना भट्ट हिने दिलेलं एक विधान तिच्या अंगलट आलं असून, सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.
एका मीडिया पोर्टलशी बोलताना फरहाना भट्टने खामेनेई यांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. ती म्हणाली, "खामेनेई हे असं व्यक्तिमत्व होतं ज्यांना कधीच विसरता येणार नाही. ते अनेकांसाठी मसीहा होते आणि ते नेहमीच आमच्या हृदयात जिवंत राहतील. अल्लाह त्यांची शहादत कबूल करो. काश्मीरी लोकांची मनं या बातमीने होरपळून निघाली आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण सेहरीनंतर मी अजिबात झोपू शकले नाही. नमाज पडताना मला खूप रडू आलं, कारण असं व्हायला नको होतं."
advertisement
advertisement
फरहानाच्या वक्तव्यानंतर टीकेची झोड
खामेनेई यांच्याबद्दल पुळका दाखवणं फरहानाला चांगलंच महागात पडलं आहे. इराणमध्ये महिलांवर होणारे अत्याचार आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा दाखला देत नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आहे.
एका युजरने कमेंट केली की, "फरहाना, कृपया पूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय अशा गंभीर विषयावर बोलू नका. अनेक निष्पाप मुलींवर तिथे अत्याचार झाले, त्यांचा आवाज दाबला गेला. हा धर्माचा नाही, तर मानवतेचा प्रश्न आहे." दुसऱ्या एका युजरने संताप व्यक्त करत लिहिलं, "आपल्या देशात प्रत्येक प्रकारचे अडाणी लोक भरलेले आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं."
advertisement
इराणमधील परिस्थिचे भारतात पडसाद
खामेनेई यांच्या मृत्यूनंतर भारतातही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही ठिकाणी लोक शोक व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले, तर बॉलिवूडमधील काही कलाकारांनी हा 'हुकूमशाहीचा अंत' असल्याचं म्हणत आनंद व्यक्त केला आहे. फरहाना भट्टने भावनिक होऊन केलेल्या विधानामुळे ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अनेकांनी तिला इतिहासाचा अभ्यास करण्याचा सल्लाही दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 9:42 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'खामेनेई कायम आमच्या हृदयात राहतील', BB19 फेम अभिनेत्रीच्या पोस्टवरून राडा; नेटकऱ्यांनी झापझाप झापलं









