advertisement

'संतांवर' गोविंदगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य, देहू संस्थानाकडून तातडीचं स्पष्टीकरण, महाराजांना खडसावलं

Last Updated:

गोविंदगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानाचे विश्वस्त तसेच तुकाराम महाराजांचे वंशज दिलीप महाराज मोरे यांनी त्यांना सुनावले.

गोविंदगिरी महाराज
गोविंदगिरी महाराज
अनिस शेख, प्रतिनिधी, देहू : आपल्या संत परंपरेमध्ये दासबोधच केवळ ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्ये आहेत. त्याचबरोबर नामदेव महाराजांनी तुकाराम महाराज यांची गाथा हे संकलन आहे, असे वादग्रस्त वक्तव्य स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी पुणे विद्यापीठातल्या ज्ञानोबा ते तुकोबा या तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात केले. स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा याचे आदर्श रामदास स्वामी आहेत, असे ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावरून वादंग उठला असताना देहू संस्थानाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
गोविंदगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानाचे विश्वस्त तसेच तुकाराम महाराजांचे वंशज दिलीप महाराज मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोविंदगिरी महाराजांनी मांडलेले मत हे त्यांचे वैयक्तिक वक्तव्य आहे. त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्रातील कोणताही शहाणा माणूस या वक्तव्याशी सहमत होणार नाही, असे दिलीप महाराज मोरे म्हणाले.
advertisement

देहू संस्थानाने खडसावलं

तर वैभव महाराज मोरे यांनी महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्र संतांच्या विचारावर चाललेला आहे. तुकारामांचे अभंग हे पंचम वेद म्हणून अभ्यासले जातात. महाराजांच्या प्रत्येक अभंगावर मोठा अभ्यास झाला आहे. अणु व रेणू यावर महाराजांनी अभंग रचले आहेत. महाराजांची गाथा जो वाचेल त्याच्या जीवनात अमुलाग्र बदल होतील. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत महाराजांचे अभंग हे अभंगच राहतील, अशा शब्दात ज्ञानोबा तुकाबांचं महत्त्व देहू संस्थानाने गोविंद गिरी महाराज यांना सांगितले आहे.
advertisement

ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेला अप्रत्यक्षपणे कमी लेखण्याचा प्रयत्न

संतपरंपरेत दासबोधच केवळ ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्ये आहेत. त्याचबरोबर नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या गाथा या संकलन आहेत, असे वादग्रस्त विधान करून अप्रत्यक्षपणे स्वामी गोविंदगिरी महाराजांनी ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेला अप्रत्यक्षपणे कमी लेखण्याचा प्रयत्न केला.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'संतांवर' गोविंदगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य, देहू संस्थानाकडून तातडीचं स्पष्टीकरण, महाराजांना खडसावलं
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement